घरांना रंग चढवणारे पेन्टर्स झाले बेरंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 07:18 PM2020-04-23T19:18:43+5:302020-04-23T19:24:49+5:30

कोरोनाच्या संसगार्पासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी झालेले लॉकडाऊन काही अपवाद वगळता नागरिक पाळतही आहेत. या लॉकडाऊनचा परिणाम अनेकांच्या कामांवर झाला असून, रोज कमावेल तर रोज खाईल अशी अवस्था असणाऱ्यांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे.

The painters are in trouble | घरांना रंग चढवणारे पेन्टर्स झाले बेरंग

घरांना रंग चढवणारे पेन्टर्स झाले बेरंग

Next
ठळक मुद्देलॉकडाऊनचा मार रोजगारावर, कुटूंबावर उपासमारीचे ओझेवर्षभर तरी काम मिळण्याची शक्यता नाहीच



लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या संसगार्पासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी झालेले लॉकडाऊन काही अपवाद वगळता नागरिक पाळतही आहेत. या लॉकडाऊनचा परिणाम अनेकांच्या कामांवर झाला असून, रोज कमावेल तर रोज खाईल अशी अवस्था असणाऱ्यांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. विशेष म्हणजे, मध्यमवर्गावर हा मार जास्त पडत असल्याचे दिसून येते. हा वर्ग अतिशय स्वाभिमानी असल्याने स्थिती दयनीय आहे. घरादारांना रंगसाज चढवून चकचकीत करणारे पेन्टर्स मध्यमवर्गातच मोडतात. लॉकडाऊनमुळे किमान वर्षभर तरी ते बेरंग राहण्याची भिती निर्माण झाली आहे.
साधारणत: जानेवारी ते जून हा काळ पेण्टर्ससाठी अतिशय अनुकूल असतो. या काळात नविन बांधकामे झालेली असतात तर जुन्याच घरांवर नवीन रंगरंगोटी करण्यासाठी नागरिक उत्सुक असतात. मात्र, चिनपासून सुरू झालेला कोरोना महामारीचा प्रसार भारतातही झाला आणि मार्च पासून संपूर्ण भारत लॉकडाऊनमध्ये गेला. इतर रोजगारांप्रमाणे पेन्टर्सही घरीच बसून राहिले. आॅर्डरप्रमाणे काम करावे आणि आपला पैसा घरी न्यावा, अशी दैनंदिनी असलेल्या या वर्गावर आता उपासमारीचे संकट निर्माण झाले आहे. महिनाभरापासून हाताला काम नाही म्हणून पैसाही नाही. असे जवळपास २५ हजार पेण्टर्स शहरात पुढे येणाºया संकटाशी झुंज देत आहेत. सध्या लॉकडाऊन सुरू आहे आणि कधी उठेल याचा नेम नाही. लॉकडाऊन उठल्यावरही जिवनमान सुरळित होण्यास बराच वेळ जाणार आहे. त्यातच पावसाळ्यात पेण्टिंग्जची कामे नसतात. दिवाळीत कामे निघत असली तरी यंदा उन्हाळ्याची तुट भरून काढण्यासाठीच नागरिकांचा प्रथम कल असेल. अशा स्थितीत पेण्टरवर्ग दयनिय अवस्थेत जाण्याची शक्यता आहे. वर्षभर तरी पेण्टर्स वर्ग विनारोजगार असण्याची भिती निर्माण झाली आहे.

पालकमंत्र्यांकडे दिले निवेदन
पेण्टर्सच्या असंघटित कामगार संघटनेचे संयोजक रमेश नागदवणे यांनी ही दयनिय अवस्था नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे. आम्ही परीश्रमी आहोत आणि कुणापुढे कधी हात पसरवत नाही. मात्र, शासनाने साथ दिली नाही तर भिक मागण्याची वेळ आमच्यावर येणार आहे. गरीबांना शासन व इतर संघटना मदत पोहोचवत आहेत. मात्र, आमचे घर स्लॅबचे असल्याने आम्ही सधन असल्याचा भ्रम होतो. आम्ही सधन नसलो तरी थोडीफार प्रतिष्ठा आहे. तेव्हा पालकमंत्र्यांनी शासकीय योजनेतून प्रत्येक पेण्टर्सला या काळात दोन ते अडिच हजार रुपयाची मदत करावी, अशी मागणी रमेश नागदवणे यांच्यासह राजेश नागदवणे, सुरेश नागदवणे, शेखर डोंगरे, महिपाल ढवळे, दिनेश वर्मा, अनिल नंदेश्वर, बंटी हिरेखण, सुनिल वानखेडे यांनी केली आहे.

Web Title: The painters are in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.