कबड्डी स्पर्धेत पळसगावने मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:11 AM2021-02-16T04:11:03+5:302021-02-16T04:11:03+5:30

उमरेड : तालुक्यातील बेला येथे आयोजित ६० किलो वजन गटातील कबड्डी स्पर्धेत अटीतटीच्या अंतिम सामन्यात पळसगाव (ता. सिंदी) येथील ...

Palasgaon won the Kabaddi tournament | कबड्डी स्पर्धेत पळसगावने मारली बाजी

कबड्डी स्पर्धेत पळसगावने मारली बाजी

Next

उमरेड : तालुक्यातील बेला येथे आयोजित ६० किलो वजन गटातील कबड्डी स्पर्धेत अटीतटीच्या अंतिम सामन्यात पळसगाव (ता. सिंदी) येथील संत सखुबाई क्रीडा मंडळाने बाजी मारली. १५,००१ रुपयाचे रोख पारितोषिक या संघाने पटकाविले. शिवप्रतिष्ठान क्रीडा मंडळाच्या वतीने बेला येथील जय सेवा मैदानाच्या पटांगणावर सदर स्पर्धेचे आयोजन पार पडले. स्पर्धेचे उद्घाटन बेला ठाण्याचे ठाणेदार शिवाजी भांडवलकर, माजी जिल्हा परिषद सदस्य जयकुमार वर्मा, सरपंच सुनंदा उकुंडे, महेश दिवसे, देवेंद्र कोचे, कीर्ती सुरनकर, अरुण बालपांडे, पुरुषोत्तम चिंचुलकर, राजेश मरसकोल्हे, सुनील गावंडे, खिरदास चिकराम, बाबुराव शेडमाके, राजेश शिवणकर, किशोर बानकर, संदीप झोडे आदींची उपस्थिती होती. सदर स्पर्धेत ३० संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे दुसरे पारितोषिक मकरधोकडा येथील वीर शिवाजी क्रीडा मंडळ, तृतीय बक्षीस बेला येथील शिवरत्न क्रीडा मंडळ तर चौथे पारितोषिक युवक विद्यार्थी क्रीडा मंडळाने पटकावीत लक्ष वेधले. गिरीश घुमडे, रोशन तेलरांधे, भूषण घुमडे, राकेश तेलरांधे, सुशांत घुमडे, ओमप्रकाश महाकाळकर, राहुल तेलरांधे, अभिषेक मंडलिक, मेघ चिंचुलकर, अक्षय तेलरांधे, अविनाश निमजे, खुशाल ठाकरे, वैभव चिकनकर, पांडुरंग खोडे आदींनी सहकार्य केले.

Web Title: Palasgaon won the Kabaddi tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.