नंदनवनचा पीएसआय एसबीच्या जाळ्यात

By admin | Published: January 7, 2016 03:35 AM2016-01-07T03:35:08+5:302016-01-07T03:35:08+5:30

नंदनवन पोलीस ठाण्यातील एका पीएसआयला १५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) चमूने पकडले.

Pandan sabanananean PSI | नंदनवनचा पीएसआय एसबीच्या जाळ्यात

नंदनवनचा पीएसआय एसबीच्या जाळ्यात

Next

१५ हजारांची मागितली लाच : पोलीस विभाग हादरला
नागपूर : नंदनवन पोलीस ठाण्यातील एका पीएसआयला १५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) चमूने पकडले. ही कारवाई बुधवारी दुपारी १.३० वाजता करण्यात आली. एकाच दिवशी दोन पोलीस अधिकाऱ्यांवर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे पोलीस विभाग हादरून गेला आहे.
रामेश्वर राऊत (५२) असे आरोपी पीएसआयचे नाव आहे. तक्रारकर्ता पद्माकर बावणे यांना संपत्ती कर विभागाचे डिमांड नोट वितरित करण्याचे कंत्राट मिळाले आहे. श्यामली परसागरे नावाची महिला त्यांच्याकडे काम करीत होती. डिमांड नोट वेळेवर वितरित न केल्यामुळे बावणे यांनी श्यामलीला एकदा फटकारले होते. ६ डिसेंबर रोजी श्यामलीने आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास राऊत यांच्याकडेच होता. राऊत यांनी बावणेमुळेच श्यामलीने आत्महत्या केल्याचे सांगून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तसेच कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपये मागितले. आपण निर्दोष असल्याने आपल्याला कुठलाही त्रास देऊ नये, अशी विनंती केली. राऊत यांनी २० ऐवजी १५ हजार रुपये देण्यास सांगितले. बावणे यांनी एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने प्राथमिक चौकशी केला असता लाच मागितल्याचे आढळून आले. त्यानुसार राऊतला पकडण्याची योजना आखण्यात आली.
योजनेनुसार बुधवारी दुपारी १.३० वाजता बावणे पैसे घेऊन नंदनवन पोलीस ठाण्यात पोहोचले. राऊत यांची साप्ताहिक रजा होती. ते ठाण्याजवळच राहतात.

अधिकाऱ्यांनी केला पाठलाग
नागपूर : राऊत यांनी बावणेला नंदनवन सिमेंट रोड स्थित एका हॉटेलच्या मालकाजवळ पैसे देण्यास सांगितले. बावणेने हॉटेल मालकला ११,५०० रुपये दिले. तसेच दूर लपून बसलेल्या एसीबीच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. एसीबीचे अधिकारी राऊत यांच्यावर नजर ठेवून होते. दरम्यान हॉटेल मालकाजवळून पैसे घेऊन राऊत बाहेर जाताना दिसले.
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला. राऊत यांना शंका आली. त्यांनी पैसे फेकून दिले. काही दूर गेल्यावर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना पकडले. परंतु जवळ पैसे नसल्याने एसीबीचे अधिकारीही विचारात पडले. राऊत हे सहायक उपनिरीक्षक म्हणून अजनीत तैनात होते. ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ मोहिमेदरम्यान वसुली केल्याच्या तक्रारीनंतर त्यांची मुख्यालयात बदली करण्यात आली. दीड वर्षांपूर्वीच ते नंदनवन पोलीस ठाण्यात आले. ही कारवाई एसीबीचे एसपी राजीव जैन यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक मिलिंद तोतरे, निरीक्षक शुभांगी देशमुख, मोनाली चव्हाण आदींनी केली.

Web Title: Pandan sabanananean PSI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.