पंतप्रधानांच्या आवाहनाला पंडित, ज्योतिषाचार्यांचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 04:56 PM2020-04-04T16:56:49+5:302020-04-04T16:58:33+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता दिप प्रज्वलित करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या या आवाहनाला शास्त्रार्थ करणारे विद्वान पंडित आणि ज्योतीषाचार्यांनीही पाठिंबा दिला आहे.

Pandits, astrologers support the Prime Minister's call | पंतप्रधानांच्या आवाहनाला पंडित, ज्योतिषाचार्यांचा पाठिंबा

पंतप्रधानांच्या आवाहनाला पंडित, ज्योतिषाचार्यांचा पाठिंबा

Next
ठळक मुद्दे वसुधैव कुटुंबकमसाठी हा क्षण महत्त्वाचा दीप उजळा घरोघरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संकटाच्या विरोधात एकजूट होण्यासाठी आणि संपूर्ण विश्वाचे कल्याण साधण्याची प्रार्थना करण्याच्या उद्देशाने रविवारी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता दिप प्रज्वलित करण्याचे आवाहन केले आहे. हे आवाहन कोणत्याही अंधश्रद्धेपोटी नसून, समाजात एकमेकांप्रतीची आस्था निर्माण करण्यासाठी आणि सर्वांच्या पाठीशी सर्वच उभे आहेत, ही भावना निर्माण करण्यासाठी केले गेले. पंतप्रधानांच्या या आवाहनाला शास्त्रार्थ करणारे विद्वान पंडित आणि ज्योतीषाचार्यांनीही पाठिंबा दिला आहे.
माणूस संकटाला घाबरतो आणि घाबरलेला प्राणी संकटापासून मुक्ती मिळविण्यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्याचा मागे पुढे पाहत नाही. एका अर्थाने संकटाच्या काळात प्राण्याचे चित्त थाऱ्यावर राहत नाही आणि तो विचलित होत जातो. अशा वेळी नेतृत्त्वकर्त्याने संयम बाळगत संकटाचा सामना करण्यासाठी सर्वसामान्यांमध्ये विश्वास आणि लढण्याची क्षमता जागृत करावी लागते. तेच कार्य पंतप्रधान करत आहेत. केंद्र व राज्य सरकारांमार्फत वेगवेगळ्या यंत्रणा युद्धस्तरावर कोरोना विषाणूच्या विरोधात कार्य करित आहेत. डॉक्टर, नर्सेस थेट मैदानात असून, त्याला बॅकअप म्हणून पोलीस व इतर सुरक्षा यंत्रणा मैदानावर सज्ज आहेत. हे अशा प्रकारे युद्ध सुरू असताना, जे मागे राहिले असतात त्यांना धीर देण्याचे कर्तव्य नेतृत्त्वकर्त्याचे आहे. नेमके तेच कार्य पंतप्रधानांकडून होत असून, २२ मार्च ला टाळी-थाळी-घंटा नाद करण्याचे आवाहन केले गेले तर ५ एप्रिलला दिवे लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याला प्रत्येकच गोष्ट राजकारणाच्या दृष्टीकोणातून बघणाऱ्यांकडून तोल-मोल लावल्या जात आहे तर सर्वसामान्यांकडूनही संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. मात्र, कायम मुहूर्ताचा, शुभ-अशुभ तिथीचा, ग्रह-ताºयांचा अभ्यास करणाºया ज्योतिषशास्त्रज्ञांकडून पंतप्रधानांच्या या आवाहनाला एकदिलाने पाठिंबा दर्शविण्यात आला आहे. ज्योतिषशास्त्रावरील विश्वास हा ज्याचा त्याचा एक भाग असला तरी एक शास्त्र म्हणून अभ्यासावयाच्या ठोकताळ्यात ५ एप्रिल हा दिवस अतिशय शुभ असा प्राप्त झाल्याचे ज्योतीशास्त्रज्ञ सांगत आहेत.


चंद्राचा सिंह राशीत प्रवेश - अनिल वैद्य
: रविवारी ५ एप्रिल रोजी चंद्र सिंह राशीत (सूर्याची रास) सात अंश ३१ कलेवरून भ्रमण करणार आहेत. ग्रहांच्या विशिष्ट परिस्थितीमुळे रात्री ८.४५ वाजता पृथ्वी आणि चंद्राच्या दरम्यान एक पोकळी निर्माण होणार असून, सूर्याचे अतिनिल किरणे आणि इन्फ्रारेड किरणे चंद्रावरून अपवर्तित होऊन भारतीय उपखंडावर पडणार आहेत. या किरणांमुळे विषाणूची हालचाल मंदावते. याच वेळी दिवे प्रज्वलित केल्याने कोट्यवधी दिव्यांतून एकसाथ निघणारा प्रकाश व ऊर्जा त्या किरणांना साथ देईल आणि शत्रूच्या विरोधात एकसाथ उभे असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण होईल, असे आंतराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले.


एकोप्यासाठी सर्वच कार्य शुभ - कमलेश शर्मा
: सामाजिक एकोप्यासाठी केलेले सर्वच कार्य शुभ आणि त्याचा महूर्तही शुभच असतो. पंतप्रधानांनी भारताच्या आरोग्यासाठी दिपप्रज्वलनाचे आवाहन केले आहे. दीपप्रज्वलनाची शुभ क्रिया ही दररोजच केली जाते आणि एका विशिष्टसमयी संपूर्ण देश ही क्रिया करत असेल तर आपण सगळेच एक आहोत आणि एकमुखाने कोरोनाचा नायनाट करण्यास सज्ज आहोत, ही भावना प्रबळ होईल, अशी भावना सीताबर्डी येथे शनी मंदिरचे प्रमुख पुजारी व शास्त्र अभ्यासक पं. कमलेश शर्मा यांनी व्यक्त केली.

Web Title: Pandits, astrologers support the Prime Minister's call

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.