पंढरपूरचा पांडुरंग हा श्रीकृष्ण वंशाचाच वारसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2021 11:40 AM2021-02-01T11:40:43+5:302021-02-01T11:41:12+5:30
Nagpur News पांडुरंग हे भगवान श्रीकृष्णाच्या वंशाचा वारसा हाेय, असा संशाेधनात्मक अंदाज प्रसिद्ध संत साहित्य संशाेधक व अभिलेखतज्ज्ञ डाॅ. म. रा. जाेशी यांनी व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंढरपूरचा पांडुरंग हा शैव व वैष्णव परंपरेचे प्रतीक हाेय. पुराणातील दाखल्यानुसार भगवान श्रीकृष्णाच्या मुलाला महाराेग झाल्यानंतर गुरुस्थानी असलेल्या ऋषींनी त्यांना पाशुपतांची आरधना करण्यास सांगितले हाेते. भगवान शिव म्हणजे श्रीकृष्णाच्या वंशजाचे दैवत म्हणजेच गुरू हाेते. विठ्ठल म्हणजे विष्ण म्हणजेच श्रीकृष्ण हे त्यांचे गुरू भगवान शिव म्हणजेच पांडुरंग यांना डाेक्यावर घेऊन उभे आहेत, असे दाखले पुराणात सापडतात. म्हणजेच देवतांमध्येही गुरू-शिष्याचे नाते हाेते. यावरून पांडुरंग हे भगवान श्रीकृष्णाच्या वंशाचा वारसा हाेय, असा संशाेधनात्मक अंदाज प्रसिद्ध संत साहित्य संशाेधक व अभिलेखतज्ज्ञ डाॅ. म. रा. जाेशी यांनी व्यक्त केला.
विदर्भ संशाेधन मंडळाच्या साप्ताहिक संगाेष्ठीअंतर्गत रविवारी पांडुरंग विठ्ठल यावर डाॅ. जाेशी यांचे संशाेधनात्मक व्याख्यान आयाेजित केले. डाॅ. जाेशी यांनी देशात सापडलेले विविध शिलालेख तसेच स्कंद पुराण, विष्णू पुराण, मत्स्यपुराण आदींमधील उदाहरणे सादर केली. पांडुरगाबद्दल असलेल्या अनेक आख्यायिका जाेडून त्यांनी वर्णन केले. पांडुरंगाचा संदर्भ दक्षिणेकडील आंध्र प्रदेश व आताचे तेलंगणा राज्यांमधील एका राजाच्या सेनापतीशीही जुळते. पाशुपत परंपरेतील या साधकाचे नावही पांडुरंग असेच हाेते. पांडुरंग आणि विठ्ठल यांच्यात गुरु शिष्याचे नाते हाेते. इसवी सनापूर्वी दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकात हा उल्लेख सापडताे. विष्णू म्हणजेच भगवान श्रीकृष्णाचे वंशज शैव परंपरेचे साधक हाेते व तेच भ्रमंती करताना महाराष्ट्राच्या पंढरपूरला आले असावे, असा अंदाज डाॅ. जाेशी यांनी व्यक्त केला. भगवान विष्णू यांच्या पुराणातील उल्लेखात आषाढी एकादशीच्या यात्रेचा उल्लेख सापडताे. तीच परंपरा आजही पंढरपुरात सुरू असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. असे विविध उदाहरणे देऊन डाॅ. जाेशी यांनी त्यांच्या संशाेधनातील दुवे समजाविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संयाेजन संशाेधन मंडळाचे व्यवस्थापक डाॅ. शेषशयन देशमुख यांनी केले.