पाणीपट्टी थकबाकीदारांनाही अभय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:25 AM2020-12-16T04:25:56+5:302020-12-16T04:25:56+5:30
गत काळात मालमत्ता कर व पाणी करासाठी फक्त १५ दिवस अभय योजना राबविण्यात आली होती. मात्र यावेळी दोन ...
गत काळात मालमत्ता कर व पाणी करासाठी फक्त १५ दिवस अभय योजना राबविण्यात आली होती. मात्र यावेळी दोन महिने योजना राहणार असल्याने ८०टक्के वसुली होईल. अशी आशा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी व्यक्त केली. लिलावात सहभागी मालमत्ताधारक या योजनेचा लाभ घेऊन मालमत्ता लिलावातून वाचवू शकतात. दंडाच्या रकमेतून ५०ते ८० टक्के सवलत दिली जाईल.
मालमत्ताकरासाठी १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी या कालावधीत अभय योजना सादर करण्यात आली आहे. मालमत्ता कराची ६०० कोटींची थकबाकी आहे. चालू वर्षात २५० कोटींच्या डिमांड काढण्यात आलेल्या आहेत. नियमित कर भरणाऱ्यांनाही सामान्य करात ४ टक्के सवलत दिली जाते. ६३,८८४ थकबाकीदारांनी ४० कोटी जमा केले. तर ३,७४,६३७ थकबाकीदारांकडे ५६० कोटींची थकबाकी आहे.
..........
मनपाची ८१२ कोटींची थकबाकी
मनपाची मालमत्ता व पाणी कराची ८१२.६७ कोटींची थकबाकी आहे. यात मालमत्ता कर ६०० कोटी तर पाणी कराची २१२.६७ कोटी आहे. यामुळे मनपाने अभय योजना आणून कर वसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. परंतु शास्ती माफीमुळे मनपाला कोट्यवधीची माफी द्यावी लागणार आहे.
.........