परदा है परदा, परदे के पिछे परदानशीं है...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 11:51 PM2019-05-03T23:51:08+5:302019-05-03T23:54:05+5:30

महानायक अमिताभ बच्चन आणि सुपरस्टार ऋषीकपूर या दोन अभिनेत्यांनी सिनेप्रेक्षकांवर अधिराज्य गाजविले आहे. या दोघांची जोडी असलेल्या चित्रपटांनाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. नशीब, अमर अकबर अ‍ॅन्थोनी, कभी कभी, कुली, अजुबा अशा अनेक चित्रपटांमधून या जोडीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या दोन अभिनेत्यांच्या हिट गीतांची मेजवानी नुकतीच रसिकांना मिळाली.

Parada hai parada, Parade ke Piche Paradanashi hai ... | परदा है परदा, परदे के पिछे परदानशीं है...

परदा है परदा, परदे के पिछे परदानशीं है...

Next
ठळक मुद्देहिट्स ऑफ अमिताभ अ‍ॅन्ड ऋषी : जोडीच्या गीतांचा रसिकांना आनंद

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महानायक अमिताभ बच्चन आणि सुपरस्टार ऋषीकपूर या दोन अभिनेत्यांनी सिनेप्रेक्षकांवर अधिराज्य गाजविले आहे. या दोघांची जोडी असलेल्या चित्रपटांनाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. नशीब, अमर अकबर अ‍ॅन्थोनी, कभी कभी, कुली, अजुबा अशा अनेक चित्रपटांमधून या जोडीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या दोन अभिनेत्यांच्या हिट गीतांची मेजवानी नुकतीच रसिकांना मिळाली.
‘रागा टु रॉक’तर्फे महाराष्ट्र दिनानिमित्त ‘हिट्स अमिताभ अ‍ॅन्ड ऋषी’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृह येथे करण्यात आले. १९७० ते ८० च्या दशकातील अमिताभ व ऋषीकपूरच्या सुपरहीट गाण्यांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. हेमंत दारव्हेकर, संजीव जगताप, गौरी शिंदे, डॉ. सुधीर कुणावार, पूर्वा साल्पेकर, सुचेत्रा पद्मावार, उमा रघुरामन, मृण्मयी जगताप व कांचन इंगळे (संगीत टीचर) यांनी गायलेल्या एकापेक्षा एक सरस गीतांना श्रोत्यांनी डोक्यावर घेतले. आनंद दिला. ‘ये कहा आ गये हम..., नीला आसमा सो गया..., अंग्रेजी मे कहते थे..., चल चल मेरे भाई..., लंबूजी लंबुजी, बोलो टिंगूजी..., धूप मे निकला ना करो..., दिलवर मेरे कब तक मुझे..., छुकर मेरे मन को..., एक हसीना थी..., तेरे चेहरे से नजर नही हटती..., परबत के उस पार...परदा है परदा...’ आदी गाण्यांनी रसिकांना मनमुराद आनंद दिला. बाहेर गर्मी असताना सभागृहात टाळ्यांचा पाऊस पडत होता. अनेक गीतांना रसिकांनी वन्स मोअरची पसंती दिली.
श्वेता शेलगावकर यांच्या ओघवत्या निवेदनाने कार्यक्रमात रंगत आणली. संगीत संयोजन महेंद्र ढोले यांचे होते. कार्यक्रमाची संकल्पना इसबाबूल हसन यांची होती. संचालन संगीता जगताप यांनी केले.

Web Title: Parada hai parada, Parade ke Piche Paradanashi hai ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.