रेस्टॉरंटमध्ये बाहेर पार्सलचा बोर्ड, आत नाश्ता व जेवण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:06 AM2021-04-26T04:06:49+5:302021-04-26T04:06:49+5:30

नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणात प्रत्येक व्यक्ती नियमांचे पालन करून शासन आणि प्रशासनाला सहकार्य करीत आहे. पण काही रेस्टॉरंटमध्ये ...

Parcel board outside the restaurant, breakfast and lunch inside! | रेस्टॉरंटमध्ये बाहेर पार्सलचा बोर्ड, आत नाश्ता व जेवण!

रेस्टॉरंटमध्ये बाहेर पार्सलचा बोर्ड, आत नाश्ता व जेवण!

Next

नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणात प्रत्येक व्यक्ती नियमांचे पालन करून शासन आणि प्रशासनाला सहकार्य करीत आहे. पण काही रेस्टॉरंटमध्ये बाहेर पार्सलचा बोर्ड लटकवून आणि शटर बंद करून आत ग्राहकांना टेबलावर बसून नाश्ता व जेवण देण्यात येत आहे. रेल्वे स्टेशनसमोरील रेस्टॉरंटमध्ये सर्रास उल्लंघन करण्यात येत आहे. अनेक रेस्टॉरंटवर कठोर कारवाई करून दंड वसूल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

एवढेच नव्हे तर बार बंद असून पार्सल सेवा सुरू आहे. पण बारचालकसुद्धा ग्राहकांकडून दुप्पट दाम वसूल करीत आहेत. रेल्वे स्टेशनसमोर सर्वच रेस्टॉरंट आणि दुकाने उघडी आहेत. सर्वांचे शटर अर्धे खुले ठेवून व्यवसाय करीत आहेत. या ठिकाणी दिवसरात्र प्रत्येक वस्तू मिळत आहेत. मनपा एनडीएस पथक आणि पोलिसांचे या भागाकडे दुर्लक्ष असल्याने मालक सर्रास दुकाने खुली ठेवत आहेत. प्रशासन कोरोना साखळी तोडण्याचा प्रयत्न करीत आहे, तर दुसरीकडे हे दुकानदार कोरोनाचा संसर्ग वाढवित आहे. या ठिकाणी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येत नाही. रेल्वेने येणारे बाहेरगावच्या प्रवाशांना या ठिकाणी जेवण मिळत आहे. रेल्वेतून येणारा कुणी व्यक्ती पॉझिटिव्ह असेल तर त्याचा संसर्ग दुसऱ्याला होऊ शकतो. जवळच जीआरपी आणि आरपीएफचे पथक तैनात असते. पण कारवाई कुणीही करीत नसल्याचे चित्र आहे.

लॉकडाऊननंतरही रेल्वे स्टेशन भागात चहा, पानटपरी, रेस्टॉरंट सतत खुले असतात. या ठिकाणी नेहमीच गर्दी दिसून येते. बसून जेवण करणाऱ्यांसाठी या ठिकाणी वेगळी व्यवस्था आहे. या ठिकाणी अनेकजण मद्याचे पार्सल घेऊन या ठिकाणी मद्यपान करताना दिसून येतात. केव्हाही मद्य मिळत असल्याने मद्यपींची गर्दी पाहायला मिळते. यामुळे कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. या भागातील व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी आता पुढे आली आहे.

Web Title: Parcel board outside the restaurant, breakfast and lunch inside!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.