गोधनीवरून सुटणार पार्सल रेल्वेगाडी : भोजन, वैद्यकीय सुविधेसाठी निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 08:05 PM2020-03-30T20:05:07+5:302020-03-30T20:07:24+5:30

वैद्यकीय, भोजन यासारख्या आवश्यक वस्तूंसाठी स्पेशल पार्सल रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार मध्य रेल्वेच्या गोधनी रेल्वेस्थानकावरून न्यू तिनसुकिया दरम्यान ३१ मार्चला स्पेशल पार्सल गाडी चालविण्यात येणार आहे.

Parcel train to depart from Godhani: Decision for food, medical facilities | गोधनीवरून सुटणार पार्सल रेल्वेगाडी : भोजन, वैद्यकीय सुविधेसाठी निर्णय

गोधनीवरून सुटणार पार्सल रेल्वेगाडी : भोजन, वैद्यकीय सुविधेसाठी निर्णय

Next
ठळक मुद्देन्यू तिनसुकियाला जाणार

लोकमत  न्यूज  नेटवर्क 
नागपूर : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे लॉकडाऊन केले आहे. परंतु वैद्यकीय, भोजन यासारख्या आवश्यक वस्तूंसाठी स्पेशल पार्सल रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार मध्य रेल्वेच्या गोधनी रेल्वेस्थानकावरून न्यू तिनसुकिया दरम्यान ३१ मार्चला स्पेशल पार्सल गाडी चालविण्यात येणार आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ००१०५ स्पेशल पार्सल रेल्वेगाडी ३१ मार्चला रात्री ८ वाजता गोधनीवरून सुटेल. ही गाडी ३ एप्रिलला रात्री २.३० वाजता न्यू तिनसुकिया येथे पोहोचेल. तर ००१०६ पार्सल स्पेशल रेल्वेगाडी न्यू तिनसुकियावरून ३ एप्रिलला दुपारी १२ वाजता सुटून ५ एप्रिलला सायंकाळी ७ वाजता पोहोचेल. दोन्ही पार्सल स्पेशल गाड्या दुर्ग, बिलासपूर, झारसुगडा, राऊरकेला, टाटानगर, बटानगर, दनकुनी, मालदा टाऊन, न्यू बोंगईगाव येथे थांबतील. दोन्ही पार्सल रेल्वेगाड्यात २० पार्सल कोच आणि एक गार्ड कम लगेज व्हॅन राहील. पार्र्सलची मागणी वाढल्यास आणखी पार्सल रेल्वेगाड्या चालविण्यात येतील, असा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

नागपूरमार्गे कल्याण-सांकराईल विशेष पार्सल रेल्वेगाडी
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने कल्याण-सांकराईल दरम्यान विशेष पार्सल रेल्वेगाडीच्या ४ फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ००१०१ पार्सल रेल्वेगाडी कल्याणवरून २ आणि ९ एप्रिलला रात्री ८.३० वाजता सुटून तिसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता सांकराईलला पोहोचेल. ००१०२ विशेष पार्सल रेल्वेगाडी ६ आणि १३ एप्रिलला रात्री १० वाजता सांकराईल येथून सुटून तिसºया दिवशी सायंकाळी ६ वाजता कल्याणला पोहोचेल. ही गाडी इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, बडनेरा, नागपूर, दुर्ग, बिलासपूर, झारसुगडा, राऊरकेला आणि टाटानगर येथे थांबेल. कल्याण ते चांगसरी दरम्यान २ विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येतील. यात ००१०३ कल्याणवरून ७ एप्रिलला रात्री ८.३० वाजता सुटून १० एप्रिलला दुपारी १२ वाजता चांगसरीला पोहोचेल. तर ००१०४ विशेष पार्सल रेल्वेगाडी चांगसरीवरून १० एप्रिलला रात्री ११.३० वाजता सुटून १३ एप्रिलला रात्री ८ वाजता कल्याणला पोहोचेल. दोन्ही गाड्या इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, बडनेरा, नागपूर, दुर्ग, बिलासपूूर, झारसुगडा, राऊरकेला, टाटानगर, सांकराईल, बटानगर, दनकुनी, मालदा टाऊन, न्यू बोंगईगाव येथे थांबेल.

Web Title: Parcel train to depart from Godhani: Decision for food, medical facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.