पालकांनो, मुलांमधील राग, आक्रमकता रोखायची कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2023 08:46 PM2023-02-09T20:46:33+5:302023-02-09T20:46:59+5:30

Nagpur News पौगंडावस्थेत येणाऱ्या मुलांमध्ये चिडचिड, रागीटपणा वाढत आहे. याला पालकांची वर्तणूक जबाबदार असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

Parents, how to prevent anger, aggression in children? | पालकांनो, मुलांमधील राग, आक्रमकता रोखायची कशी?

पालकांनो, मुलांमधील राग, आक्रमकता रोखायची कशी?

googlenewsNext

नागपूर : पौगंडावस्थेत येणाऱ्या मुलांमध्ये चिडचिड, रागीटपणा वाढत आहे. याला पालकांची वर्तणूक जबाबदार असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. त्यामुळे पालकांनी स्वत:च्या वर्तणुकीबद्दल दक्ष असायला हवे. विशेषत: राग व्यक्त करण्यासाठी योग्य पद्धतीचा वापर करायला हवा, अतिकडक शिक्षा कटाक्षाने टाळायला हवी. मात्र कुठल्या गोष्टी केलेल्या चालणार नाहीत, याची मुलांना स्पष्ट जाणीव द्यायला हवी. मुलांना त्यांच्या भावना मांडण्यालाही प्राधान्य द्यायला हवे, असे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

अलीकडे बदललेली जीवनशैली व वाढत्या भौतिक सुविधांमुळे मुलांमध्ये विचार व आचार बदलत आहेत. मुलांचा ‘स्क्रीन टाइम’ वाढल्याने ते आपल्या पालकांशी, मित्रांशी कमी संपर्क ठेवतात. त्यातूनच जेवण कमी करणे, रात्री उशिरापर्यंत जागणे अशा गोष्टी घडतात. याचा परिणाम मुलांमध्ये राग आक्रमकतेच्या स्वरूपात दिसू लागतो. त्यामुळे पालकांनी मुलांना उलट रागावण्यापेक्षा त्यामागील कारण जाणून घेतले पाहिजे, त्यांच्यातील बदल वेळीच ओळखले पाहिजे.

- दहापैकी आठ केसेस रागीट, आक्रमक मुलांच्या

अलीकडच्या काळात मुलांमध्ये चिडचिडपणा वाढत चालला आहे. विविध कारणांमुळे मुले रागीट बनले आहेत. दहापैकी आठ मुले हे लवकर राग येणारे असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

-काय खबरदारी घ्याल

आई-वडिलांनी मुलांसोबत वागताना तारतम्य ठेवा. त्यांच्यासमोर मोठ्या आवाजात बोलणे, चिडून बालणे टाळा.

-हे करा

: पालकांनी मुलांसोबत किंवा त्याच्यासमोर व्यायाम करणे, पुस्तक वाचणे, प्रार्थना करणे, सोबत जेवण करायला हवे. याचा सकारात्मक परिणाम होतो.

: पालकांनी मुलांच्या वयानुसार वागायला हवे. गरज पडल्यानुसार आपल्या भूमिका बदलायला हव्यात.

-मुले रागीट होण्याची कारणे काय?

: अभ्यासाचा अतिरिक्त ताण शिक्षकांकडून मिळणारी अपमानास्पद वर्तणूक.

: पालकांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने त्याचे रूपांतर रागात होणे.

: मोबाइलवर गेम खेळणे, त्यात पराभव झाल्यावर आदळआपट करणे.

: आई-वडील नोकरीला गेल्यानंतर घरात एकटेपणा घेऊन वावरणारी मुले.

-ही भावनिकता घसरत असल्याचे लक्षण

जेव्हा मनुष्यामध्ये भय नावाची भावना निर्माण होते तेव्हा तो पळवाट शोधतो किंवा आक्रमक होतो. मुलांना आई-वडिलांना सोडून जाता येत नसल्याने ते आक्रमक होतात. हे भावनिकता घसरत असल्याचे म्हणजे हताशपणा येत असल्याचे लक्षण आहे. प्रत्येक आईवडील आपल्या मुलांकडूनही बऱ्याच अपेक्षा, आकांक्षा ठेवतात. यामुळे मुलांच्या मनात संघर्ष निर्माण होतो. शिवाय, स्क्रीन टाइम वाढल्याचा परिणाम ‘डायलेक्टिक मेमरी’ म्हणजे ‘व्यवहारिक स्मृती’वर होतो. या स्मृतीची योग्य पद्धतीने वाढ न झाल्यानेही राग व आक्रमकता वाढताना दिसून येत आहे.

-डॉ. शैलेश पानगावकर, बाल मानसोपचार तज्ज्ञ

Web Title: Parents, how to prevent anger, aggression in children?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य