पालकांनी मुलांना न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिन द्यावी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:09 AM2021-07-14T04:09:29+5:302021-07-14T04:09:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : न्यूमोनियापासून बाळांच्या संरक्षणासाठी त्यांना न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिन (पीसीव्ही) लस देण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा, असे ...

Parents should give pneumococcal conjugate vaccine to children () | पालकांनी मुलांना न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिन द्यावी ()

पालकांनी मुलांना न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिन द्यावी ()

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : न्यूमोनियापासून बाळांच्या संरक्षणासाठी त्यांना न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिन (पीसीव्ही) लस देण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी सोमवारी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत त्या बोलत होत्या.

पालकांना या लसीबाबत काही अडचण असल्यास जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा अंगणवाडी सेविका व आशा वर्करशी संपर्क साधावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. बालकांना विविध आजारांपासून संरक्षण मिळावे, यासाठी राज्यात नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत विविध लसी दिल्या जातात. त्यामध्ये आता न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिन (पीसीव्ही) या नवीन लसीचा नियमित लसीकरण कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. एक वर्षाच्या आतील बालकांना न्यूमोनिया, मेनेटांयटीस, बॅक्टेरीमिया, सेपसीस, ओटायटीस आणि सायनुसायटीस आजारापासून ही लस संरक्षण देईल. न्यूमोकोकल/न्यूमोनिया हा फुप्फुसांना होणारा संसर्ग आहे. ज्यामुळे बालकांना श्वास घ्यायला त्रास होतो. धाप लागते आणी ताप व खोकला येतो. संसर्ग गंभीर स्वरूपाचा असल्यास मृत्यूही होऊ शकतो. यावर उपाय म्हणून देण्यात येणारी (पीसीव्ही) ही लस मुलांना तीन डोसमध्ये देण्यात येते. पहिला डोस ६ आठवडे, दुसरा डोस १४ आठवडे व तिसरा बुस्टर डोस ९ महिने या वयात देण्यात येतो.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षा मेश्राम व डॉ. इनामदार उपस्थित होते.

- पीसीव्ही लस नि:शुल्क उपलब्ध

जिल्हास्तरावर पीसीव्ही लस उपलब्ध झाली असून ती सर्व सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय येथे उपलब्ध आहे. उद्या १३ जुलै रोजी नियमित लसीकरण सत्रामध्ये मुलांना ही लस मोफत देण्यात येणार आहे.

ग्रामीण भागातील नियमित लसीकरण सत्र दर मंगळवार व गुरुवार या दोन दिवशी होते. या दिवशी कार्यक्षेत्रातील बालकांचे लसीकरण करण्याचे निर्देश अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. फुटाणे यांनी दिले. या लसीसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचे आवश्यक ते प्रशिक्षण झाले आहे.

Web Title: Parents should give pneumococcal conjugate vaccine to children ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.