नागपुरातील धंतोली, रामदासपेठ भागातील पार्किंगची समस्या सुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 01:42 AM2018-07-25T01:42:49+5:302018-07-25T01:43:33+5:30
धंतोली व रामदासपेठ परिसरात मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल आहेत तसेच बाजारपेठ असल्याने वाहनांची गर्दी असते. या परिसरात पार्किंगची व्यवस्था नसल्याने रस्त्याच्या कडेला वा जागा मिळेल तेथे वाहने उभी केली जातात. यामुळे वाहतुक ीची कोंडी निर्माण होते. ही समस्या सोडविण्यासाठी कृषी विभागाच्या रामदासपेठ येथील १८ एकर जागेवर वाहनतळ उभारण्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आयुक्तांनीही या खर्चाला तसेच प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्याला मंजुरी दिली आहे. यामुळे धंतोली, रामदासपेठ भागातील पार्किंगची समस्या लवकरच सुटणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धंतोली व रामदासपेठ परिसरात मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल आहेत तसेच बाजारपेठ असल्याने वाहनांची गर्दी असते. या परिसरात पार्किंगची व्यवस्था नसल्याने रस्त्याच्या कडेला वा जागा मिळेल तेथे वाहने उभी केली जातात. यामुळे वाहतुक ीची कोंडी निर्माण होते. ही समस्या सोडविण्यासाठी कृषी विभागाच्या रामदासपेठ येथील १८ एकर जागेवर वाहनतळ उभारण्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आयुक्तांनीही या खर्चाला तसेच प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्याला मंजुरी दिली आहे. यामुळे धंतोली, रामदासपेठ भागातील पार्किंगची समस्या लवकरच सुटणार आहे.
वाहनतळासाठी रामदासपेठ येथील कृषी विभागाची १८ एकर जागा उपलब्ध करण्याबाबतचा प्रस्ताव सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी सभागृहात आणला होता. अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्याची सूचना केली होती. मंगळवारी महापालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. बुधवारी हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला जाणार आहे. लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळणार असल्याचा विश्वास संदीप जोशी यांनी व्यक्त केला.
वाहनतळावर उद्यान, रुग्णवाहिकांचे वाहनतळ, अग्निशमन विभागाची वाहने ठेवण्यासाठी व्यवस्था केली जाणार आहे. येथे दोन हजाराहून अधिक वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था होणार असल्याने या भागातील वाहतुकीची कोंडी सुटण्याला मोठी मदत होणार आहे.
मुख्यालय परिसरात स्वतंत्र शौचालय उभारणार
महापालिका मुख्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे, परंतु प्रशस्त असे शौचालय नाही. यामुळे नागरिकांची अडचण होते. याचा विचार करता येथे प्रशस्त शौचालय उभारले जाणार आहे. यासाठी ५० लाखांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच विधी वाचनालयासाठी ५०लाख, बस्तरवारी येथील ई-वाचनालयासाठी ४० लाख, लोकमान्य टिळक अध्ययन कक्षासाठी २५ लाखांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे.
लाडली लक्ष्मीला संख्या मर्यादा नाही
महापालिकेने लाडली लक्ष्मी योजनेचे नियोजन बेटी बचाव या उद्देशाने केले आहे. मागील सत्रात लाभार्थींची संख्या एक हजारापर्यंत मर्यादित ठेवण्यात आली होती. मात्र मागणी विचारात घेता या योजनेच्या लाभार्थींच्या संख्येवरील मर्यादा हटविण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज करणाºया सर्व पात्र लाभार्थीला या योजनेचा लाभ मिळणार आहे.