राम मंदिराच्या उभारणीसाठी परमार्थ निकेतनने दिले ५१ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:11 AM2021-02-28T04:11:39+5:302021-02-28T04:11:39+5:30
ऋषीकेश : उत्तराखंडमधील ऋषीकेश येथे असलेल्या परमार्थ निकेतन या आश्रमाकडून अयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या राम मंदिराच्या उभारणीसाठी ५१ ...
ऋषीकेश : उत्तराखंडमधील ऋषीकेश येथे असलेल्या परमार्थ निकेतन या आश्रमाकडून अयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या राम मंदिराच्या उभारणीसाठी ५१ लाख रुपयांची देणगी दिली आहे. परमार्थ निकेतनचे अध्यक्ष स्वामी चिदानंद सरस्वती महाराज यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली.
या दरम्यान, परमार्थ निकेतनच्या वतीने स्वामीजींनी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महामंत्री चंपत राय यांना भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी ५१ लाख रुपयांचा निधी धनादेश स्वरूपात प्रदान केला. योगी यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान, प्रयागराज कुंभ मेळा-२०१९ चा समावेश गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये केल्याबद्दल स्वामी चिदानंद यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. कुंभ मेळा हरिद्वार आणि परमार्थ निकेतनमध्ये एप्रिल-मे महिन्यात होऊ घातलेल्या ‘श्री राम कथा’ मध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रणही दिले. यावेळी स्वामीजींनी ११ हजार रोपट्याचे अयोध्येमध्ये रोपण करण्याची इच्छा व्यक्त केली. अयोध्या येथील जागा निश्चित झाल्यास रुद्राक्ष रोपट्याच्या रोपणाला प्रारंभ होऊ शकतो.