परीक्षांना अत्यावश्यक सेवेत सहभागी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:08 AM2021-04-25T04:08:52+5:302021-04-25T04:08:52+5:30
- राज्यभरातील कुलगुरूंनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांकडे केली मागणी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळविण्यासाठी ...
- राज्यभरातील कुलगुरूंनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांकडे केली मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक दी चेन मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत केवळ अत्यावश्यक सेवा वगळता शेष सेवांवर कठोर निर्बंध लादले आहे. यामुळे, परीक्षा व परीक्षा कार्य बाधित होत असल्याची भावना राज्यभरातील विद्यापीठांचे कुलगरू व्यक्त करत आहेत. त्यामुळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे कुलगुरूंनी परीक्षांना अत्यावश्यक सेवांमध्ये सहभागी करण्याची मागणी केली आहे. मात्र, या मागणीवर राज्य सरकारकडून अद्याप कोणताही निर्णय घेतला गेला नाही, हे विशेष.
सामंत यांच्यासोबत २२ एप्रिल रोजी कुलगुरूंची बैठक पार पडली. परीक्षांना अत्यावश्यक सेवांमध्ये सहभागी केल्यास विश्वविद्यालयांतील परीक्षांसंदर्भातील कामांमध्ये वेग येईल, अशी भावना यावेळी कुलगुरूंनी व्यक्त केली होती. वर्तमानात निर्बंधांमुळे परीक्षेसंदर्भातील कामे प्रभावित होत आहेत. परीक्षा कार्यांशी जुळलेल्या कॉलेज व विद्यापीठांच्या कर्मचाऱ्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. शासकीय निर्देशानुसार केवळ १५ टक्के कर्मचारीच उपस्थित राहू शकत आहेत. त्याचा परिणाम विद्यापीठीय परीक्षांवर होत आहे. निर्बंधांमुळे विद्यापीठांना २६ एप्रिलपासून सुरू होत असलेल्या १२ अभ्यासक्रमांच्या प्रथम व तृतीय सत्राच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत. ज्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा आटोपल्या, त्यांचे निकाल अद्यापही जाहीर करता आलेले नाहीत. अशाच प्रकारचे कठोर निर्बंध सुरू राहिल्यास ११ मे पासून सुरू होणाऱ्या चवथ्या सत्राच्या परीक्षाही रद्द कराव्या लागण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम विद्यापीठांच्या उन्हाळी परीक्षांवर पडणार आहे.
..............