पर्वाधिराज महापर्व पर्युषण आजपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:13 AM2021-09-04T04:13:10+5:302021-09-04T04:13:10+5:30
५ सप्टेंबरला ‘लहू हो तो ऐसा’ या विषयावर महिलांसाठी विशेष प्रवचन होईल. यात घर-परिवार, नाते आणि सासू-सून यांच्यात सामंजस्यावर ...
५ सप्टेंबरला ‘लहू हो तो ऐसा’ या विषयावर महिलांसाठी विशेष प्रवचन होईल. यात घर-परिवार, नाते आणि सासू-सून यांच्यात सामंजस्यावर मार्गदर्शन होणार आहे. दुपारी हौजी गेमचा कार्यक्रम होईल. ६ सप्टेंबरला ‘एक कदम अज्ञान से ज्ञान की ओर’ होईल. आजच्या युगात शिक्षणाचे महत्त्व व शिक्षणामुळे होणारा फायदा, अशिक्षितांपासून अपमानजनक व्यवहार यावर विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रवचन होईल. दुपारी भजन अंताक्षरी स्पर्धा होईल. ७ सप्टेंबरला ‘महावीर जन्म कल्याणक वाचन’ होईल. यात आराध्य महावीर यांच्या जीवनातील गाथेचे विशेष वर्णन होणार आहे. दुपारी ‘मी अँड मॉम’ विषयावर माता आणि मुलांद्वारे विशेष सादरीकरण होणार आहे. ८ सप्टेंबरला ‘श्रवण करे जिनवानी जिंदगी बनेगी सुहानी’ विषयावर आध्यात्मिक आत्मसाधक वर्गासाठी प्रभूंच्या वचनांवर ‘रुची और उसके शुभ परिणाम’ यावर प्रकाश टाकण्यात येईल. दुपारी २ वाजता ‘एक पेन का कमाल’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ९ सप्टेंबरला ‘माँ की महिमा’ विषयावर मातृत्व भावना दर्शविणारे हृदयस्पर्शी प्रवचन होतील. दुपारी भक्तामर स्रोत स्पर्धा होईल. १० सप्टेंबरला सकाळी प्रवचन श्रुंखलेत ‘अतिथी देवो भव:’ विषयावर मार्मिक प्रवचन आणि दुपारी सामूहिक खेळ होतील. ११ सप्टेंबरला संवत्सरी महापर्वाची आराधना धर्माच्या अनेक बिंदूंशी निगडित राहील. प्रवचनात कालचक्राचा बदलता प्रभाव यावर विशेष प्रभाव टाकण्यात येईल. पुढील आठ दिवसात दररोज प्रार्थना जप, सूत्र वाचन, प्रवचन, पेंसठिया छंद, अनुष्ठान, प्रतिक्रमण आदी कार्यक्रम ठरलेल्या वेळी सामूहिकरीत्या होतील. दररोज ९ तासांचा नवकार महामंत्राचा जप होईल. धार्मिक अनुष्ठानात साध्वी चंदन बाला, साध्वी पद्मावतींनी आवाहन केले आहे की, तप, त्याग, नियम, प्रत्याख्यान यावर विशेष लक्ष द्यावे. सामूहिक उपवासाची पचरंगी करण्याचे लक्ष्य ठेवावे. तप आराधनेत शोभा जैन यांचे ९ आणि प्रदीप रांका यांचे ७ उपवास आहेत. पुढे वाटचाल करण्याचे भाव आहेत. या वेळी सहकुटुंब, इष्ट मित्र, नातेवाईकांसह धर्ममय आराधनेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
..........