नागपुरात प्रवासी बसने अचानक घेतला पेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 10:51 PM2018-12-10T22:51:10+5:302018-12-10T22:56:49+5:30
बर्डी ते खापरखेडा बसला पागलखाना चौकात सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. इंजिनमधून धूर निघण्याला सुरुवात होताच बस थांबवून सर्व प्रवाशांना बसमधून उतरवण्यात आले. आगीमुळे बसची मागील सीट जळाली. आग उग्र स्वरुप धारण करणार होती. मात्री वेळीच अग्निशमन विभागाची गाडी घटनास्थळी पोहचल्याने पुढील अनर्थ टळला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बर्डी ते खापरखेडा बसला पागलखाना चौकात सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. इंजिनमधून धूर निघण्याला सुरुवात होताच बस थांबवून सर्व प्रवाशांना बसमधून उतरवण्यात आले. आगीमुळे बसची मागील सीट जळाली. आग उग्र स्वरुप धारण करणार होती. मात्री वेळीच अग्निशमन विभागाची गाडी घटनास्थळी पोहचल्याने पुढील अनर्थ टळला.
बर्डी ते खापरेखडा ही एमएच ३१ टीए ६१७६ क्रमांकाची बस प्रवासी घेऊ न जात असताना पागलखाना चौकात इंजिनधून अचानक धूर निघू लागला. काही क्षणातच आगीमुळे बसची मागील सीट जळाली. बसचालक सूरज भरमासे व वाहक प्रियंका पांडे यांनी प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. आगीची सूचना अग्निशमन विभागाला दिली. दहा मिनिटात अग्निशमन विभागाची गाडी पोहचली व त्यांनी आग नियंत्रणात आणली.
बसच्या इंजिनमध्ये शॉट सर्किटमुळे आग लागली. बस सुरू असल्याने आग पसरल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली. सुरुवातीला प्रवाशांनी आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु यात यश आले नाही.