प्रवाशाला विमानात हृदयविकाराचा झटका, मृत घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 09:58 PM2019-02-08T21:58:05+5:302019-02-08T21:59:05+5:30

दोहा येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहाटे येणाऱ्या कतार एअरलाईन्सच्या विमानात एका वयस्क महिलेला हृदयविकाराचा झटका आला. महिलेची तब्येत खराब झाल्यामुळे विमानाला आकस्मिक उतरविण्यात आले. विमानतळावर उपचारादरम्यान त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

A passenger in plane was hit by a heart attack, declared dead | प्रवाशाला विमानात हृदयविकाराचा झटका, मृत घोषित

प्रवाशाला विमानात हृदयविकाराचा झटका, मृत घोषित

Next
ठळक मुद्देएअरवेजच्या विमानातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोहा येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहाटे येणाऱ्या कतार एअरलाईन्सच्या विमानात एका वयस्क महिलेला हृदयविकाराचा झटका आला. महिलेची तब्येत खराब झाल्यामुळे विमानाला आकस्मिक उतरविण्यात आले. विमानतळावर उपचारादरम्यान त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
कतार एअरवेजचे विमान पहाटे २.१० वाजता विमानतळावर पोहोचते. पण हे विमान पहाटे १.४५ वाजता उतरविण्यात आले. सूत्रांनी सांगितले की, विमान नागपुरात पोहोचण्यापूर्वीच ८४ वर्षीय अनीस फातिमा यांची तब्येत बिघडली. प्रारंभिक तपासणीत त्यांचे हृदयाचे ठोके कमी झाले होते. त्या विमानातच बेशुद्ध झाल्या होत्या. त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी केअर हॉस्पिटलची अ‍ॅम्ब्युलन्स आधीच विमानतळावर पोहोचली होती. डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून मृत घोषित केले. त्या अकोला येथील रहिवासी असून धार्मिक यात्रेसाठी इराकच्या नजफ शहरात गेल्या होत्या. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

 

Web Title: A passenger in plane was hit by a heart attack, declared dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.