फेस्टिव्हल स्पेशल रेल्वेगाड्यात होतेय प्रवाशांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 09:04 PM2020-10-19T21:04:09+5:302020-10-19T21:07:02+5:30
Special Fesival Train, Passangers looted,Nagpur News कोरोनामुळे रेल्वेत लॉकडाऊन करण्यात आले. सहा महिन्यानंतर रेल्वेने विशेष रेल्वेगाड्या चालविण्यास सुरुवात केली. त्यानंतर सणासुदीनिमित्त वाढलेली प्रतीक्षायादी पाहून रेल्वे प्रशासनाने फेस्टिव्हल स्पेशल रेल्वेगाड्यांची घोषणा केली. परंतु या गाड्यात प्रवाशांची आर्थिक लूट होत असून रेल्वे प्रशासनाने नियमित रेल्वेगाड्या चालविण्याची मागणी होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे रेल्वेत लॉकडाऊन करण्यात आले. सहा महिन्यानंतर रेल्वेने विशेष रेल्वेगाड्या चालविण्यास सुरुवात केली. त्यानंतर सणासुदीनिमित्त वाढलेली प्रतीक्षायादी पाहून रेल्वे प्रशासनाने फेस्टिव्हल स्पेशल रेल्वेगाड्यांची घोषणा केली. परंतु या गाड्यात प्रवाशांची आर्थिक लूट होत असून रेल्वे प्रशासनाने नियमित रेल्वेगाड्या चालविण्याची मागणी होत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वेनेही लॉकडाऊन केले हाेते. सहा महिने रेल्वेगाड्या ठप्प होत्या. केवळ मालगाड्या, विशेष पार्सल रेल्वेगाड्या आणि श्रमिकांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्या चालविण्यात आल्या. त्यानंतर जागोजागी अडकलेल्या प्रवाशांसाठी रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केली. सध्या विविध सण असल्यामुळे यात आणखी भर घालत रेल्वे प्रशासनाने फेस्टिव्हल स्पेशल रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या गाड्यात नियमित गाड्यांच्या तुलनेत प्रवाशांकडून अधिक रक्कम वसूल करण्यात येत आहे. विशेष रेल्वेगाडीच्या नावाखाली प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे रेल्वे बोर्डाने नियमित रेल्वेगाड्या चालवून प्रवाशांवर पडत असलेला आर्थिक भुर्दंड कमी करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.
असे आहेत दर
नागपूर-मुंबई
पूर्वी : फर्स्ट एसी २६००, सेकंड एसी १५५०, थर्ड एसी ११००, स्लिपर ४२०
पूजा स्पेशल : सेकंड एसी २११५, थर्ड एसी १५३५, स्लिपर ५८०
नागपूर-दिल्ली
पूर्वी : सेकंड एसी १८२५, थर्ड एसी १२८५, स्लिपर ४९०
स्पेशल : सेकंड एसी २४४०, थर्ड एसी १७८५, स्लिपर ६८५
नागपूर-पाटणा
सेकंड एसी २१७५, थर्ड एसी १५२५, स्लिपर ५८०
पूजा स्पेशल : सेकंड एसी २६२०, थर्ड एसी १९१०, स्लिपर ७५०
नियमित रेल्वेगाड्या चालवाव्यात
फेस्टिव्हल स्पेशल रेल्वेगाड्यात प्रवाशांची आर्थिक लूट होत आहे. या गाड्यात समाजातील विविध घटकांना मिळणाऱ्या सवलतीही बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने नियमित रेल्वेगाड्या चालवून प्रवाशांना दिलासा देण्याची गरज आहे.
- सतीश यादव, झेडआरयूसीसी सदस्य, मध्य रेल्वे
प्रवाशांची लूट करणे अयोग्य
कोरोनाच्या काळात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी रेल्वे विशेष रेल्वेगाड्या चालवीत आहे. विशेष रेल्वेगाड्या चालवून प्रवाशांची आर्थिक लूट करणे अयोग्य आहे. त्यामुळे रेल्वेने नियमित रेल्वेगाड्या सुरू करून प्रवाशांना कोविड १९ च्या नियमांचे पालन करण्यासाठी सूचना द्याव्यात.
-बसंत कुमार शुक्ला, महासचिव, भारतीय यात्री केंद्र