बंद एसीमुळे समता एक्स्प्रेसच्या प्रवाशांचा गोंधळ : नागपुरात रोखली गाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:20 AM2019-06-13T00:20:12+5:302019-06-13T00:21:36+5:30

विशाखापट्टणम ते निजामुद्दीन जाणाऱ्या समता एक्स्प्रेसच्या बी ४ कोचचा एसी बंद असल्यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर प्रवाशांनी एकच गोंधळ घातला. एसी दुरुस्त होईपर्यंत गाडी पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. अखेर या गाडीचा कोच बदलल्यानंतर रात्री १२ वाजता ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली.

Passengers chaos in Samata Express due to closed AC: Stop the train in Nagpur | बंद एसीमुळे समता एक्स्प्रेसच्या प्रवाशांचा गोंधळ : नागपुरात रोखली गाडी

बंद एसीमुळे समता एक्स्प्रेसच्या प्रवाशांचा गोंधळ : नागपुरात रोखली गाडी

googlenewsNext
ठळक मुद्दे दुसरा कोच लावल्यानंतर झाली रवाना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विशाखापट्टणम ते निजामुद्दीन जाणाऱ्या समता एक्स्प्रेसच्या बी ४ कोचचा एसी बंद असल्यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर प्रवाशांनी एकच गोंधळ घातला. एसी दुरुस्त होईपर्यंत गाडी पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. अखेर या गाडीचा कोच बदलल्यानंतर रात्री १२ वाजता ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली.
रेल्वेगाडी क्रमांक १२८०८ विशाखापट्टणम-निजामुद्दीन समता एक्स्प्रेसचा बी ४ चा एसी बंद होता. यामुळे प्रवाशांना उकाडा होत होता. प्रत्येक रेल्वेस्थानकावर त्यांना एसी दुरुस्त करण्याचे आश्वासन देण्यात येत होते. प्रवाशांनी गोंदिया, भंडारा रेल्वेस्थानकावर गाडी थांबविली. त्यांना पुढील रेल्वेस्थानकावर एसी दुरुस्त करण्यात येईल, असे सांगण्यात आले. नागपूर रेल्वेस्थानकावर ही गाडी रात्री १०.४० वाजता प्लॅटफार्म क्रमांक ६ वर आली. एसी दुरुस्त न झाल्यामुळे प्रवाशांचा संयम सुटला. त्यांनी एसी दुरुस्त झाल्याशिवाय गाडी पुढे जाऊ देणार नसल्याची भूमिका घेतली. रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी प्लॅटफार्मवर पोहोचले. प्रवाशांचा गोंधळ पाहून या गाडीचा कोच बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर या गाडीचा बी ४ कोच बदलण्यात आला. रात्री १२ वाजता ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली.

Web Title: Passengers chaos in Samata Express due to closed AC: Stop the train in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.