एसी बंद पडल्याने प्रवासी संतापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 12:30 AM2017-10-16T00:30:44+5:302017-10-16T00:30:54+5:30
प्रवासात रेल्वेगाडीतील एसी बंद पडल्यामुळे गर्मीमुळे प्रवासी हैराण झाले. त्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी रविवारी नागपूर रेल्वेस्थानकावर एकच गोंधळ घातला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रवासात रेल्वेगाडीतील एसी बंद पडल्यामुळे गर्मीमुळे प्रवासी हैराण झाले. त्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी रविवारी नागपूर रेल्वेस्थानकावर एकच गोंधळ घातला. एसी सुरू होईपर्यंत गाडी पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेऊन त्यांनी चेन पुलींग करीत दोन ते तीन वेळा गाडी थांबविली. रेल्वे अधिकाºयांनी प्रवाशांची समजूत घातल्यानंतर दीड तासाने संघमित्रा एक्स्प्रेस पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.
रेल्वेगाडी क्रमांक १२२९५ बंगळुरू-पाटलीपुत्र संघमित्रा एक्स्प्रेस रविवारी सकाळी १०.३० वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर आली. या गाडीचा एसी कोच बी-२ (एसडब्लूआर ०१११२) मधील एसी बंद होता. गर्मीमुळे प्रवासी त्रस्त झाल्यामुळे ते संतापले. त्यांनी चेन पुलींग करून दोन ते तीनवेळा गाडी रोखून धरली. प्लॅटफार्मवर उतरून त्यांनी गोंधळ घालणे सुरू केले. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिलोक कोठारी, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कुश किशोर मिश्रा, आरपीएफचे कमांडंट ज्योती कुमार सतीजासह इतर अधिकारी रेल्वेस्थानकावर पोहोचले. त्यांनी बी २ कोचमधील एसी सुरू करण्याचे निर्देश कर्मचाºयांना दिले. परंतु कर्मचाºयांना त्यात यश आले नाही. त्यामुळे रेल्वेगाडी दीड तास प्लॅटफार्मवरच उभी होती. अखेर अधिकाºयांनी एसी दुरुस्त करणाºया कर्मचाºयांना गाडीसोबत पाठविण्याचा निर्णय घेतला. प्रवाशांची समजुत घातल्यानंतर दुपारी १२ वाजता ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.