पाेस्ट काेविड आराेग्य तपासणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:10 AM2021-08-19T04:10:28+5:302021-08-19T04:10:28+5:30
सावनेर : ग्रामीण आराेग्य प्रशिक्षण केंद्र व इंडियन मेडिकल असाेसिएशन सावनेर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पाेस्ट काेविड ...
सावनेर : ग्रामीण आराेग्य प्रशिक्षण केंद्र व इंडियन मेडिकल असाेसिएशन सावनेर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पाेस्ट काेविड आराेग्य तपासणी शिबिराचे आयाेजन करण्यात आले. या शिबिरात तज्ज्ञ डाॅक्टरांनी नागरिकांची विविध तपासणी करून आराेग्यविषयक सल्ला व मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे हाेते. प्रमुख अतिथी म्हणून आराेग्य प्रशिक्षण केंद्राच्या प्रपाठक डाॅ. मंजुषा ढाेबळे, तहसीलदार सतीश मासाळ, आयएमए सावनेर शाखेचे अध्यक्ष डाॅ. नीलेश कुंभारे, सचिव डाॅ. परेश झाेपे यांची उपस्थिती हाेती. काेविड काळात जीवाची पर्वा न करता विशेष सेवा देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तज्ज्ञ डाॅ. अमित बाहेती, डाॅ. शुभम पुन्यानी यांनी पाेस्ट काेविड नागरिकांची आराेग्य तपासणी केली. या शिबिरात जवळपास १२५ नागरिकांची तपासणी करण्यात आली. आयाेजनासाठी डाॅ. संदीप गुजर, डाॅ. इशरत शेख, डाॅ. हरीश बरय्या, डाॅ. अक्षय काेल्हे, डाॅ. अभिनव कळमकर, संताेष बंडावार, बयाबाई भलावी, नम्रता वैद्य, घनश्याम तुर्के आदींसह परिचारिका, प्रशिक्षणार्थी डाॅक्टर व आराेग्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.