म्हणे रोज होते खड्डे दुरुस्ती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 01:06 AM2017-08-27T01:06:40+5:302017-08-27T01:07:05+5:30

शहरात रस्त्यांच्या सिमेंटीकरणाचे काम सुरू असले तरी, अनेक डांबरी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालक बेजार झाले आहेत.

Paste every day to repair ... | म्हणे रोज होते खड्डे दुरुस्ती...

म्हणे रोज होते खड्डे दुरुस्ती...

Next
ठळक मुद्देमहापालिकेचा दावा : सहा महिन्यात बुजविले तीन हजारांहून अधिक खड्डे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात रस्त्यांच्या सिमेंटीकरणाचे काम सुरू असले तरी, अनेक डांबरी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालक बेजार झाले आहेत. मात्र वातानुकूलित कार्यालयांमध्ये बसलेल्या महानगरपालिकेच्या अधिकाºयांच्या नजरेला बहुतेक हे खड्डे दिसतच नाहीत. म्हणूनच की काय शहरात रोज खड्डे पडतात व रोज खड्ड्यांची दुरुस्ती होते, असे उत्तर मनपातर्फे माहितीच्या अधिकारांतर्गत देण्यात आले आहे. जर रोज खड्ड्यांची दुरुस्ती होते, तर शहरातील हजारो खड्डे काय एका रात्रीत निर्माण झाले की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत मनपाकडे विचारणा केली होती. शहरातील खड्ड्यांची संख्या, बुजविण्यात आलेले खड्डे, खड्डे बुजविण्यासाठी प्राप्त व खर्च झालेली रक्कम इत्यादी प्रश्न उपस्थित केले होते. मनपाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, १ एप्रिल २०१४ ते १७ जून २०१७ या कालावधीत शहरात ४८ हजार २१७ खड्डे बुजविण्यात आले. यात हॉटमिक्स प्लॅन्टद्वारे बुजविण्यात आलेल्या ३६ हजार ७८ तर जेटपॅचरद्वारे बुजविण्यात आलेल्या १२ हजार १३९ खड्ड्यांचा समावेश आहे. शहरात रोज खड्डे पडतात व रोज दुरुस्ती होते. त्यामुळे खड्ड्यांची एकूण संख्येत माहिती देणे अशक्य असल्याचे
मनपाच्या उत्तरात नमूद आहे. १ जानेवारी ते १७ जून २०१७ या कालावधीत शहरामध्ये ३,२८१ खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा मनपाने केला आहे.

केवळ ४० टक्के निधी खर्च
एप्रिल २०१४ पासून खड्डे बुजविण्यासाठी मिळालेल्या ५३ कोटींच्या निधीपैकी केवळ २१ कोटी ६० लाख म्हणजेच ४०.७५ टक्के रक्कमच खर्च करण्यात आल्याची बाब माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे. ‘हॉटमिक्स प्लॅन्ट’साठी २२ कोटी प्राप्त झाले होते. यापैकी केवळ ७ कोटी १५ लाख रुपयेच खर्च करण्यात आले, तर ‘जेटपॅचर’द्वारे खड्डे बुजविण्यासाठी ३१ कोटींचा निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी केवळ १४ कोटी ४५ लाख रुपये खर्च करण्यात आले. शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे असताना उपलब्ध निधी पूर्ण खर्च का झाला नाही, हे एक कोडेच आहे.

Web Title: Paste every day to repair ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.