पतंजली नोव्हेंबरपासून सुरू करणार संत्रा ज्यूसचे उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2023 08:00 AM2023-07-14T08:00:00+5:302023-07-14T08:00:01+5:30
Nagpur News पतंजली मिहान-सेझमधील १०६ एकर जमिनीवर नोव्हेंबरपासून संत्रा ज्यूसचे उत्पादन सुरू करणार आहे. त्याचा फायदा विदर्भातील संत्रा उत्पादकांना होणार आहे.
वसीम कुरैशी
नागपूर : पतंजली मिहान-सेझमधील १०६ एकर जमिनीवर नोव्हेंबरपासून संत्रा ज्यूसचे उत्पादन सुरू करणार आहे. त्याचा फायदा विदर्भातील संत्रा उत्पादकांना होणार आहे. शिवाय ५०० जणांना रोजगारही मिळेल. त्यात वैदर्भीय युवकांना संधी दिली जाणार आहे. याकरिता अमेरिकेतून मशीन आल्या आहेत.
पतंजली मिहान-सेझमध्ये सहविकासक बनण्याच्या तयारीत आहे. तसा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे ही जागा वेगवेगळ्या संबंधित अन्य कंपन्यांना लीजवर देऊ शकेल. मल्टी झोन उत्पादन व्यवस्थेनंतरही मिहानमध्ये फूड प्रोसेसिंग झोन नाही. एमएडीसीच्या अधिकाऱ्यांमुळे मिहान-सेझमध्ये औद्योगिक विकास वेगाने होऊ शकतो.
७० टन कणिकचे उत्पादन
मिहानमध्ये पतंजलीने कणिकचे उत्पादन सुरू केले असून, सध्या ७० टन क्षमता आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगाणा राज्यांमध्ये विक्री करण्यात येत आहे. डिझेल आणि वाहतुकीचे दर महाग असल्याने नागपूर युनिटमधून माल पाठविणे कंपनीला परवडत नाही.