पतंजली योग समिती व शिव चॅरिटेबल ट्रस्ट, मौदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:06 AM2021-07-05T04:06:33+5:302021-07-05T04:06:33+5:30

मौदा नगर पंचायतच्या अध्यक्षा भारती सोमनाथे यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण आणि दीप प्रज्वलन ...

Patanjali Yoga Committee and Shiv Charitable Trust, Mouda | पतंजली योग समिती व शिव चॅरिटेबल ट्रस्ट, मौदा

पतंजली योग समिती व शिव चॅरिटेबल ट्रस्ट, मौदा

Next

मौदा नगर पंचायतच्या अध्यक्षा भारती सोमनाथे यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण आणि दीप प्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन सोहळ्याला उपनगराध्यक्ष मुन्ना चलसानी, जनता विद्यालयाचे पर्यवेक्षक खुशाल दुबे, डॉ. सुनील बोरकर, राजू सोमनाथे, देवीदास कुंभलकर, रमेश कुंभलकर, चिरव्हा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रेखा सय्याम, देवेंद्र सोनटक्के, ईश्वर पत्रे, दिनेश ढोबळे, नंदकिशोर कनोजे, एकनाथ कापगते आदी मान्यवर उपस्थित होते. नागपूर येथील रेनबो ब्लड अ‍ॅण्ड कम्पोनेंट बँकेचे डॉ. रविराज भांगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्त संकलनाचे कार्य केले.

-----------------

आकाशझेप फाऊंडेशन व नगर पंचायत, पारशिवनी

पारशिवनी : लोकमत वृत्तपत्र समूह, आकाशझेप फाऊंडेशन आणि नगर पंचायत पारशिवनीच्या वतीने रविवारी संत तुकाराम सभागृह येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात पारशिवनी शहर आणि ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

पारशिवनी नगर पंचायतच्या नगराध्यक्षा प्रतिभा संजय कुंभलकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. ‘लोकमत रक्ताचं नातं’ ही मोहीम ग्रामीण भागातील नागरिकांना रक्तदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. यासोबतच सामाजिक भाव निर्माण करीत असल्याचे प्रतिपादन कुंभलकर यांनी याप्रसंगी केले.

रामटेक पंचायत समितीचे खंड विकास अधिकारी प्रदीप बमनोटे, आकाशझेप फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. अरविंद दुणेदार, सचिव साक्षोधन कडबे, मानवता एकता मंच पारशिवनीचे संयोजक डॉ. इरफान अहमद, जीवोदय फाऊंडेशनच्या अध्यक्षा सोनाली काकूनिया, लोकमत सखी मंचच्या सिंधूताई चव्हाण, ज्ञानविकास कला प्रतिष्ठानच्या संयोजिका नीता इटनकर, नगरसेवक विजय भुते, नगरसेविका अनिता भड, गोपाल कडू, रूपेश खंडारे, सचिन सोमकुवर, संजय रायपुरे, इम्रान बाघाडे, हर्षलता शेळके, नीता गोमकाळे प्रामुख्याने उपस्थित होते. शिबिरात रक्त संकलनाचे कार्य डागा स्मृती शासकीय रुग्णालय, नागपूरच्या चमूने केले. शिबिराच्या यशस्वीतेकरिता पारशिवनी नगर पंचायतचे रोशन येरखेडे, प्रवीण सायरे, ईश्वर सायरे, रामेश्वर मेश्राम यांनी सहकार्य केले.

Web Title: Patanjali Yoga Committee and Shiv Charitable Trust, Mouda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.