पतंजलीचा जगातील सर्वात मोठा संत्रा प्रक्रिया प्रकल्प नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 10:52 AM2017-12-12T10:52:31+5:302017-12-12T10:56:36+5:30

पतंजली आयुर्वेद लिमिटेड नागपूरच्या मिहान-सेझमध्ये जगातील सर्वात मोठा संत्रा-प्रक्रिया प्रकल्प उभारणार आहे. एकूण ३५०० ते ५००० कोटी गुंतवणूक असलेला हा स्वयंचलित प्रकल्प २०१८ मध्ये उत्पादन सुरू करेल, अशी माहिती पतंजली आयुर्वेदचे प्रबंध संचालक आचार्य बालकृष्ण यांनी दिली.

Patanjali's largest orange processing plant in Nagpur | पतंजलीचा जगातील सर्वात मोठा संत्रा प्रक्रिया प्रकल्प नागपुरात

पतंजलीचा जगातील सर्वात मोठा संत्रा प्रक्रिया प्रकल्प नागपुरात

Next
ठळक मुद्दे३५०० ते ५००० कोटी गुंतवणूक प्रकल्प सुरू होणार २०१८ मध्ये

सोपान पांढरीपांडे।
आॅनलाईन लोकमत
नागपूर : पतंजली आयुर्वेद लिमिटेड नागपूरच्या मिहान-सेझमध्ये जगातील सर्वात मोठा संत्रा-प्रक्रिया प्रकल्प उभारणार आहे. एकूण ३५०० ते ५००० कोटी गुंतवणूक असलेला हा स्वयंचलित प्रकल्प २०१८ मध्ये उत्पादन सुरू करेल, अशी माहिती पतंजली आयुर्वेदचे प्रबंध संचालक आचार्य बालकृष्ण यांनी दिली. नागपुरात १६ ते १८ डिसेंबरदरम्यान आयोजित ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’च्या पार्श्वभूमीवर आचार्य बालकृष्ण यांनी केलेली ही घोषणा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
लोकमतशी विशेष वार्तालाप करताना आचार्य बालकृष्ण म्हणाले की, या संत्रा-प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता दर दिवशी ८०० टन (४० ट्रक) राहील. या प्रकल्पात संत्र्याचा ज्यूस तर तयार होईलच पण सालीपासून तेल काढल्या जाईल व उरलेल्या चोथ्याचाही सुयोग्य उपयोग केला जाईल. याचबरोबर दररोज ६०० टन क्षमता असलेला खाद्यान्न-प्रक्रिया प्रकल्पही मिहान-सेझमध्ये आणत आहोत. यात आवळा, टोमॅटो, अ‍ॅलोव्हेरा (कोरफड) व इतर फळवर प्रक्रिया करून पॉवर विटा, ग्लुकोज, नूडल्स, ब्रेड, बिस्कीट इत्यादी उत्पादनांचे कारखाने राहतील. या दोन्ही प्रकल्पांमध्ये जागतिक गुणवत्ता मानकाचे उदा. यूएसएफडीए, युरोपियन युनियनची मानके यांचे काटेकोर पालन करून उत्पादने निर्यातही केली जातील, असे आचार्य बाळकृष्ण म्हणाले.


शेतकऱ्यांचे हित हा आमचा संकल्प
दोन वर्षापूर्वी जेव्हा माध्यमांमध्ये शेतकरी आत्महत्येच्या बातम्यांमुळे व्यथित होऊन योगगुरू बाबा रामदेव यांनी आमचे लक्ष विदर्भाकडे वेधले. आम्ही इथल्या पिकांचा, जमिनीचा व शेती पद्धतीचा व विशेष नागपूरचा देशातील केंद्रस्थानाचा सखोल अभ्यास केला व नागपुरात प्रकल्प उभा करण्याचा निर्णय घेतला, अशी माहितीही आचार्य बालकृष्ण यांनी दिली.

आचार्य बालकृष्ण देशातील आठवे धनाढ्य व्यक्ती
आचार्य बालकृष्ण यांची पतंजली आयुर्वेदमध्ये ९४ टक्के मालकी आहे तर उरलेले सहा टक्के मालकी हक्क योगगुरू बाबा रामदेव यांचेकडे आहे. आंतरराष्टय संशोधन संस्था हरून इंडियाच्या धनाढ्य व्यक्तींच्या यादीत ७०,००० कोटी संपत्ती मूल्य असलेले आचार्य बालकृष्ण आठव्या क्रमांकावर आहेत. गेल्या वर्षी त्यांच्या संपत्तीमूल्यात १७३ टक्क्यांची वाढ झाली. या यादीप्रमाणे मुकेश अंबानी सर्वात धनाढ्य व्यक्ती असून त्यांचे संपत्तीमूल्य २,५७,९०० कोटी आहे.


पतंजलीचे बिझनेस मॉडेल
पतंजलीच्या व्यवसाय पद्धतीबद्दल बोलताना आम्ही ‘बॅकवर्ड इंटिग्रेशन’ करतो असे सांगून आचार्य बालकृष्ण म्हणाले आम्ही शेतकऱ्यांकडून थेट कच्चा माल विकत घेतो. त्यात झारीतील शुक्राचार्य ठरणारे दलाल आम्ही टाळतो म्हणून शेतकऱ्यांना अधिक मोबदला मिळतो. आमच्या प्रक्रिया प्रकल्पात बलाढ्य क्षमता व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही उत्पादन खर्च आटोक्यात ठेवतो त्यामुळे ग्राहकांना उत्पादने स्वस्त किमतीत मिळतात. शेतकऱ्यांना जास्त मोबदला आणि ग्राहकांसाठी स्वस्त किंमत हे आमचे ध्येय आहे, असे आचार्य बालकृष्ण म्हणाले. योग्य तेवढा कच्चा माल मिळावा म्हणून आम्ही शेतकऱ्यांना बी-बियाण्यांसोबत तंत्रज्ञान देतो व उत्पादनांच्या पॅकिंगपर्यंत सर्व प्रक्रिया पतंजलीच्या एकाच छत्राखाली उभ्या करतो त्यामुळे शेतकरी व ग्राहक दोघांचाही फायदा होतो.
दरवर्षी पतंजलीची उलाढाल दुप्पट होण्याचे रहस्य काय यावर बोलताना आचार्य बालकृष्ण म्हणाले २०१५-१६ मध्ये पतंजलीची उलाढाल ५००० कोटी होती ती २०१६-१७ मध्ये १०५६१ कोटी झाली पण २०१७-१८ मध्ये ती २०,००० कोटीपेक्षा जरा कमीच राहील असे आचार्य बालकृष्ण म्हणाले. नागपूरसोबतच आसाममध्ये पतंजली आयुर्वेदिक औषधे व सौंदर्य प्रसाधनांचा १५०० कोटींचा प्रकल्प उभा करत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Web Title: Patanjali's largest orange processing plant in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fruitsफळे