साधूच्या सहवासाने मोक्षमार्ग प्रशस्त होतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:10 AM2020-12-30T04:10:13+5:302020-12-30T04:10:13+5:30
आचार्यश्री पंचकल्याणकसागरजी महाराज यांचे उद्गार नागपूर : इतवारीत लाडपुरा येथील श्री पार्श्वप्रभू दिगंबर जैन मंदिराच्या सन्मती भवनात आचार्यश्री पंचकल्याणकसागरजी ...
आचार्यश्री पंचकल्याणकसागरजी महाराज यांचे उद्गार
नागपूर : इतवारीत लाडपुरा येथील श्री पार्श्वप्रभू दिगंबर जैन मंदिराच्या सन्मती भवनात आचार्यश्री पंचकल्याणकसागरजी महाराजांचे प्रवचन सुरू आहे. सोमवारी आचार्यश्री यांनी सांगितले की, साधूच्या सहवासाने मोक्षाचा मार्ग प्रशस्त होतो. बीजापासून अंकुर, पित्यापासून पुत्र आणि गुरूपासून शिष्य ही परंपरा चालत आली आहे. परंतु तीर्थंकर भगवान यांचे गुरू नसतात. ते स्वयंभू असतात. उर्वरीत ठिकाणी परंपरा कायम आहे. ही परंपरा अनेक काळापासून सुरु आहे. आता २४ व्या तीर्थंकर भगवान महावीरांपासून गुरु परंपरा चालत आली आहे. ती शाश्वत परंपरा आहे. गुरुचे आशीर्वाद घेण्याची पात्रता असायला हवी. गुरुप्रती श्रद्धा असायला हवी. पात्रतेमुळे आशीर्वाद फळाला येतो. तारखेनुसार आचार्यश्री विमलसागरजी यांचा समाधी दिवस २९ डिसेंबर आहे. त्यांची समाधी तीर्थराज सिद्धक्षेत्र सम्मेदशिखर आहे. कार्यक्रमात दीपप्रज्वलन अध्यक्ष सतीश पेंढारी, मंत्री उदय जोहरापूरकर, पन्नालाल खेडकर, प्रचार-प्रसार मंत्री हिराचंद मिश्रीकोटकर, सुधीर सावळकर, परिमल खेडकर, नरेंद्र तुपकर यांनी केले. मंगलाचरण डॉ. नयना संगई, सरोज मिश्रीकोटकर, नंदा जोहरापूरकर यांनी गायले. शास्त्र भेट संगीता पेंढारी, प्रमिला देवलसी यांनी केली. धर्मसभेचे संचालन सतीश पेंढारी यांनी केले. यावेळी विलास आग्रेकर, राजकुमार खेडकर, द्विपेंद्र जोहरापूरकर, रवींद्र महाजन उपस्थित होते.
...........
हे होतील कार्यक्रम
सन्मती भवनात आचार्यश्री पंचकल्याणकसागरजी यांच्या सानिध्यात २९ डिसेंबरला सकाळी ८.३० वाजता प्रवचन होईल. आचार्य विमलसागरजी महाराजांच्या समाधी दिनानिमित्त विनयांजली कार्यक्रम होईल.
३० डिसेंबरला विश्वशांतीसाठी भगवानाचा अभिषेक आणि शांतीधारा होईल. त्यानंतर प्रवचन होईल. ३१ डिसेंबरला आचार्यश्री कुंथुसागरजी यांचा ५५ वा दीक्षा दिवस आणि ७५ वा जन्मोत्सव हीरक महोत्सवाच्या रूपाने साजरा करण्यात येईल.
..............