‘फेक वेबसाइट’च्या माध्यमातून रुग्णांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:08 AM2021-04-22T04:08:32+5:302021-04-22T04:08:32+5:30
नागपूर : कोरोनाबाबत नागरिकांमध्ये असलेल्या भीतीचा फायदा घेत त्यांना फेक वेबसाइटच्या माध्यमातून लुबाडण्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. ...
नागपूर : कोरोनाबाबत नागरिकांमध्ये असलेल्या भीतीचा फायदा घेत त्यांना फेक वेबसाइटच्या माध्यमातून लुबाडण्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
'पतंजली' या नावाने एक फेक वेबसाइट तयार करून रुग्णांना त्यांच्या जवळच्या परिसरातील रुग्णालयात बेड उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी प्रति दिवस दोन हजार रुपये असे १५ दिवसांसाठी ३० हजार रुपये जमा करावे, अशी जाहिरात या वेबसाइटवरून करण्यात येत आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांनी हा प्रकार
मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आणली. त्याची तातडीने शहानिशा करून नागरिकांची लुबाडणूक थांबवावी, अशी सूचना केली.
महापौरांनी माहिती मिळताच याबाबत शहानिशा करण्यासाठी व्हॉट्सॲपवर याबाबत माहिती मागविली. ही बनवाबनवी असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या वेबसाइटचे सत्य नेमके काय हे उघडकीस आणून नागरिकांची होणारी लुबाडणूक थांबवावी, अशी सूचना प्रशासनाला केली.