नागपुरात ‘ब्रुसेलोसिस’चा आढळला रुग्ण; शासकीय दरबारी अद्यापही नोंद नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2020 03:30 AM2020-10-04T03:30:02+5:302020-10-04T07:09:13+5:30

​​​​​​खासगी हॉस्पिटलमध्ये १४ वर्षीय मुलावर उपचार सुरू

A patient was diagnosed with brucellosis in Nagpur | नागपुरात ‘ब्रुसेलोसिस’चा आढळला रुग्ण; शासकीय दरबारी अद्यापही नोंद नाही

नागपुरात ‘ब्रुसेलोसिस’चा आढळला रुग्ण; शासकीय दरबारी अद्यापही नोंद नाही

Next

- सुमेध वाघमारे 

नागपूर : चीनच्या वुहानमध्ये आता ब्रुसेलोसिस जीवाणूच्या संसर्गाने लोक आजारी पडत आहेत. नागपुरातही शुक्रवारी एका १४ वर्षीय मुलाला या आजाराचे निदान झाले. खासगी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. शासकीय दरबारी त्याची अद्यापही नोंद झालेली नाही.

ब्रुसेलोसिसची गाय, मेंढी, शेळ्या आणि कुत्र्यांना मुख्यत: लागण होते. या आजार झालेल्या प्राण्यांचे कच्चे दूध किंवा कमी शिजविलेले मांस खाल्ल्यास तो होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार ब्रुसेलोसिस बॅक्टेरियाग्रस्त प्राण्याच्या दुधापासून बनवलेल्या पनीरमधूनही लागण होऊ शकते. पण संसर्गाचे प्रमाण खूप कमी आहे. या आजारावर एक-दीड वर्ष औषधे घ्यावी लागतात.

घातक आजार नाही
मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, लक्षणे दिसायला एक आठवडा ते दोन महिन्यांपर्यंतचा कालावधी लागू शकतो. ताप येणे, डोके दुखणे, सांधे दुखणे आदी लक्षणे दिसून येतात. हा आजार घातक नाही. महाराष्ट्र राज्य पशुवैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. अजय पोहरकर म्हणाले, १५ वर्षांपूर्वी भंडारा जिल्ह्यात ब्रुसेलोसिसचे नऊ रुग्ण आढळले होते. ब्रुसेलोसिस निर्मूलनाचाही कार्यक्रम आहे.

Web Title: A patient was diagnosed with brucellosis in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.