मेडिकलमध्ये होत आहेत रुग्णांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:07 AM2021-07-15T04:07:28+5:302021-07-15T04:07:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये रुग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. हृदयाचे ऑपरेशन्स होत नसून, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये रुग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. हृदयाचे ऑपरेशन्स होत नसून, फुफ्फुसावरील उपचारासाठी देण्यात आलेली दीड कोटी रुपये किमतीची मशीन धूळखात पडली असल्याचा आरोप शहर राकाँपाने केला आहे.
पक्षाच्या शिष्टमंडळाने शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्त्वात आज या संदर्भात मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांना निवेदन दिले. निवेदनात औषध खरेदी व वितरण यंत्रणेत प्रचंड भ्रष्टाचार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोरोना संक्रमित रुग्णांव्यतिरिक्त इतर आजाराच्या रुग्णांना असुविधेचा सामना करावा लागत आहे. ओपीडी रोज दुपारी २ वाजता बंद होत आहे. फार्मसीही बंद केली जात असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. फार्मसी २४ तास सुरू ठेवा, खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करा, प्रलंबित ऑपरेशन लवकरात लवकर करा व रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शिष्टमंडळात वर्षा शामकुळे, महादेव फुके, जानबा मस्के, लक्ष्मी सावरकर, शैलेंद्र तिवारी, रिजवान अन्सारी, नूतन रेवतकर, रवींद्र इटकेलवार, रमण ठवकर, प्रकाश लिखानकर, शैलेश पांडे, रविनीश पांडे, अशोक काटले, श्रीकांत शिवणकर, धनंजय देशमुख, महेंद्र भांगे, मुन्ना तिवारी, सुखदेव वंजारी, संतोष सिंह, शिव भेंड़े, स्वप्निल अहिरकर, शरद साहू, योगेश न्यायपारे, मोहन गुरुपंच सहभागी होते.
.............