पाेवाडा गायनाने शाहीर कलावंतांनी वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:39 AM2021-02-05T04:39:39+5:302021-02-05T04:39:39+5:30
कुही : भाेजापूर येथील लाेककला शाहीर मंडळाच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त शाहीर कलावंतांसाठी गीतगायन व पाेवाडा गायन कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात ...
कुही : भाेजापूर येथील लाेककला शाहीर मंडळाच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त शाहीर कलावंतांसाठी गीतगायन व पाेवाडा गायन कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. कार्यक्रमात पाेवाडा गायनातून शाहीर कलावंतांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
कार्यक्रमाचे उद्घाटन शाहीर मानेराव व सरपंच लालाजी दंडारे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी शेषराव शेबे हाेते. शाहीर कलावंतांनी आपली संस्कृती जपत भारतमातेला परकीयांच्या बंदिस्त गुलामगिरीतून मुक्त हाेण्यासाठी प्रामाणिक पुरेसे याेगदान दिले. अशा लाेककलेला जिवंत ठेवून नव्या पिढीला ओळख देण्यासाठी व मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी दरवर्षी मंडळाच्या माध्यमातून प्रजासत्ताकदिनी लाेकगीत गायन कार्यक्रमाचे आयाेजन हा स्तुत्य उपक्रम असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. याप्रसंगी मंडळातर्फे विविध ठिकाणाहून आलेल्या १५ शाहीर कलावंतांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला मंडळाचे वसंत भाेयर, कांचन भाेयर, तुळशीराम बाेंद्रे, श्रीकृष्णा शेबे, राेमदेव शेबे, अर्चना बाेंद्रे, देवानंद बसेशंकर, लक्ष्मण डहारे, ज्याेत्स्ना शेबे, शाहीर रामचंद्र खडसे, प्रभुदास बाेंद्रे, भानुदास माेहतुरे, भाऊराव ठवकर, कैलास थाेटे आदी उपस्थित हाेते.