विदर्भातील पर्यावरणाकडे लक्ष द्या

By admin | Published: November 12, 2014 12:58 AM2014-11-12T00:58:49+5:302014-11-12T00:58:49+5:30

नागपुरातील नाग नदीला पुनरुज्जीवित करून विदर्भातील पर्यावरणाच्या समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी विदर्भ एन्व्हायरमेंटल अ‍ॅक्शन ग्रुपने केली आहे.

Pay attention to the environment in Vidarbha | विदर्भातील पर्यावरणाकडे लक्ष द्या

विदर्भातील पर्यावरणाकडे लक्ष द्या

Next

‘व्हीईएजी’ची मागणी : मुख्यमंत्र्यांकडे करणार पाठपुरावा
नागपूर : नागपुरातील नाग नदीला पुनरुज्जीवित करून विदर्भातील पर्यावरणाच्या समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी विदर्भ एन्व्हायरमेंटल अ‍ॅक्शन ग्रुपने केली आहे.
पर्यावरणाच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी झालेल्या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा चर्चा करण्यात आली. ‘व्हीईएजी’ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारात बैठकीतील मुद्दे मांडण्याचा निर्णय घेतला असून, मुख्यमंत्री याकडे तातडीने लक्ष देऊन ते सोडवतील, अशी अपेक्षा संघटनेचे संयोजक सुधीर पालीवाल यांनी व्यक्त केली आहे. नाग नदी आणि अंबाझरी तलावाचे संवर्धन व पुनरुज्जीवन करणे महत्त्वाचे आहे. नाग नदी शुद्धीकरणाच्या योजनेची सुरुवात फडणवीस महापौर असताना झाली होती. केंद्राकडून मदत घेऊन नाग नदीचा कायापालट केल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडेल. अंबाझरी तलावाचे अस्तित्व धोक्यात आहे. नाग नदी डिनोटिफाईड झाल्यास तलावाच्या परिसरातील बांधकाम संपुष्टात येऊ शकते, असेही पालीवाल यांनी स्पष्ट केले आहे. कोराडी येथे १९८० मेगावॅट वीज प्रकल्पामुळे प्रदूषणाची पातळी वाढण्याचा धोका आहे. वीज प्रकल्पाचा विस्तार शहरशेजारी करण्यात आला आहे. पर्यावरण व वन मंत्रालयाच्या अनेक शिफारशी या प्रकल्पाने धुडकावून लावल्या आहेत. फ्लाय गॅस डिसल्फरायझेशन लावणे आवश्यक असताना त्याचे पालन करण्यात आलेले नाही. दूषित पाण्याचा निचरा करण्याची योग्य व्यवस्था नाही, याकडेही पालीवाल यांनी लक्ष वेधले आहे. विदर्भाच्या विविध भागात मोठे वीज प्रकल्प उभारण्याला आमचा ठाम विरोध आहे. भंडाऱ्यात ओलिताखालील शेतजमिनीवर उभारण्यात येणारा वीज प्रकल्प थांबवण्यात यावा. शेतकऱ्यांची परवानगी न घेताच शेतातून वीज प्रवाहाचे टॉवर उभारणे ही या भागातील आणखी एक समस्या आहे.
वाईल्ड लाईफ कॉरिडॉर्सचा शोध घेऊन त्याचे रक्षण करण्यासाठी ठोस धोरण जाहीर करावे. पायाभूत सोयींच्या नावाखाली वाईल्ड लाइफ कॉरिडॉर्स उद्ध्वस्त करण्यात येत आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हायवेवरील मोठे वृक्ष अन्य ठिकाणी जगतील याची काळजी घेण्यात यावी.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे सर्व प्रश्न माहीत असल्याने या सर्व मुद्यांवर ठोस धोरण जाहीर करतील, असा विश्वास पालीवाल यांनी व्यक्त केला आहे. बैठकीत अमरावती विद्यापीठाच्या माजी कुलगुरू कमल सिंग, परमजित आहुजा, आशिष डगवार,आकाश मिश्रा, डॉ. नईम खान, संगीता मिश्रा यांनीही विविध मुद्दे उपस्थित केले. (प्रतिनिधी)

Web Title: Pay attention to the environment in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.