कंत्राटदारांना तीन महिन्यापासूनची थकीत राशी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:13 AM2021-09-04T04:13:05+5:302021-09-04T04:13:05+5:30
कोराडी : कोराडी येथील वीज निर्मिती केंद्रात काम करणाऱ्या कंत्राटदारांना तीन महिन्यांपासून महानिर्मितीने संबंधित कामाची राशी न दिल्याने वीज ...
कोराडी : कोराडी येथील वीज निर्मिती केंद्रात काम करणाऱ्या कंत्राटदारांना तीन महिन्यांपासून महानिर्मितीने संबंधित कामाची राशी न दिल्याने वीज निर्मिती कंत्राटदार अडचणीत सापडले आहेत. कंत्राटदारांना कंत्राटी कामगारांचे मासिक वेतन देणेही अडचणीचे झाले आहे. शासनाच्यावतीने जीएसटी संदर्भात नोटीस येत असल्याने हवालदिल झालेल्या कंत्राटदारांना आर्थिक संकटातून सावरण्यासाठी महानिर्मितीने थकीत राशी तत्काळ द्यावी अशी विनंती एम.एस.ई.बी. कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन, कोराडीच्या वतीने करण्यात आली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष रत्नदीप रंगारी यांनी याबाबत मुख्य मुख्य अभियंत्यांना निवेदन सादर केले आहे. यात कंत्राटदारांना महानिर्मितीकडून वेळेवर राशी दिली जात नाही. कंत्राटी कामगारांच्या वेतनाचेही पैसे नियमित दिले जात नाहीत. कंत्राटदारांना मात्र कंत्राटी कामगारांचे वेतन दरमहा ठरावीक तारखेच्या पूर्वी देण्याची सक्ती केली जाते. तसेच कामगारांच्या भविष्य निर्वाह निधी, जीएसटी, विमा, आदी नियमितपणे ठरलेल्या तारखेच्या आत भरावे लागते, याकडे लक्ष वेधले आहे.