शेतकऱ्यांना एक लाखापर्यंत कर्ज माफी द्या
By admin | Published: December 18, 2014 02:46 AM2014-12-18T02:46:50+5:302014-12-18T02:46:50+5:30
नागरिकांच्या ज्वलंत समस्या आणि प्रश्न तसेच समाजातील होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी अन्याय निवारण भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या वतीने विधानभवनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
नागपूर : नागरिकांच्या ज्वलंत समस्या आणि प्रश्न तसेच समाजातील होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी अन्याय निवारण भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या वतीने विधानभवनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्रात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली असून शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे शासनाने त्यांना एक लाखापर्यंत कर्जमाफी द्यावी, कृषिपंपाला वीज मोफत द्यावी, स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल आठ हजार भाव द्यावा, जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ थांबवावी, सार्वजनिक मालमत्तेचे राष्ट्रीयकरण करावे, महिलांवरील अत्याचार थांबवावे, कर्मचारी राज्य विमा योजनेद्वारे कामगारांना सुविधा द्यावी, ओबीसींची जातिनिहाय जनगणना करून मंडळ आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या आदी मागण्या मोर्चात लावून धरण्यात आल्या. आंदोलनानंतर मोर्चातील शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना सादर केले. त्यांनी शेतकऱ्यांचे एक लाखापर्यंतच्या कर्जमाफीच्या मागणीवर लवकरच योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
नेतृत्व
भगवान चांदेकर, राजेंद्र नवघरे, सुरेश मारोतकर, महेंद्र सातपुते
मागण्या
शेतकऱ्यांचे एक लाखापर्यंतचे कर्ज माफ करावे
कृषिपंपाला मोफत वीज द्यावी
कापसाला प्रति क्विंटल आठ हजार भाव द्यावा
सार्वजनिक मालमत्तेचे राष्ट्रीयकरण करावे
जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ थांबवावी
महिलांवरील अत्याचार थांबवावे