ग्राम राेजगार सेवकांचे मानधन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:11 AM2021-08-29T04:11:26+5:302021-08-29T04:11:26+5:30
कळमेश्वर : ग्राम राेजगार सेवकांचे प्रलंबित मानधन तत्काळ देण्यात यावे, अन्यथा १ सप्टेंबरपासून कामबंद आंदाेलनाचा इशारा त्यांनी दिला आहे. ...
कळमेश्वर : ग्राम राेजगार सेवकांचे प्रलंबित मानधन तत्काळ देण्यात यावे, अन्यथा १ सप्टेंबरपासून कामबंद आंदाेलनाचा इशारा त्यांनी दिला आहे. याबाबत गटविकास अधिकारी महेश्वर डाेंगरे यांना ग्राम राेजगार सेवक संघटना कळमेश्वरच्या वतीने निवेदन देण्यात आले. ग्राम राेजगार सेवकांचे १६ मार्च ते ३१ मार्च २०२१ व १ एप्रिल ते ३१ जुलैपर्यंतचे मानधन अदा करण्यात यावे, प्रलंबित असलेला प्रवास भत्ता देण्यात यावा तसेच २०१८-१९ व २०१९-२० या वर्षाचा प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र जिचकार, उपाध्यक्ष वासुदेव गोतमारे, सचिव प्रकाश शिंगणे, सदस्य आदेश गोतमारे, नंदकिशोर मानकर, मनोहर निंबाळकर, संजय निमकर, मनोज ढाले, पवन धुर्वे, किसना ढवळे, चंद्रशेखर तागडे, मिलिंद भांगे, गोपाल इंगळे, प्रभाकर पेंदाम, भूषण दैने, राहुल गजभिये, भाऊराव निमकर, विजय पावडे, रामेश्वर शेटे, रूपेश निवुल आदी उपस्थित होते.