मानधन ऐवजी वेतनश्रेणी द्या : अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 12:32 AM2019-12-21T00:32:14+5:302019-12-21T00:33:37+5:30

राज्यात ८१०५ अनुदानित वसतिगृह कर्मचारी आहेत. परंतु तुटपुंज्या मानधनामुळे यांना कुटुंब चालविणे कठीण झाले आहे. वेतनश्रेणी मिळावी यासाठी संघटना गेल्या २५ वर्षांपासून आंदोलन करीत आहे,

Pay Scale instead of remuneration: morcha | मानधन ऐवजी वेतनश्रेणी द्या : अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांचा मोर्चा

मानधन ऐवजी वेतनश्रेणी द्या : अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांचा मोर्चा

googlenewsNext

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : राज्यात ८१०५ अनुदानित वसतिगृह कर्मचारी आहेत. परंतु तुटपुंज्या मानधनामुळे यांना कुटुंब चालविणे कठीण झाले आहे. वेतनश्रेणी मिळावी यासाठी संघटना गेल्या २५ वर्षांपासून आंदोलन करीत आहे, परंतु शासन लक्ष देत नाही, अशी खंत मोर्चेकरांनी बोलून दाखविली. या अधिवेशनात तरी आम्हाल न्याय मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी वर्तवली.
राज्यात सामाजिक न्याय विभागांतर्गत २३८८ अनुदानित मागासवर्गीय मुलामुलींचे वसतिगृह आहेत. ही वसतिगृह १९५१ पासून अनुदान तत्त्वावर चालविली जातात. वाढत्या महागाईच्या तुलनेत केवळ आठ हजार मानधन मिळते. या तुटपुंज्या मानधनाला कंटाळून आतापर्यंत १५ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या सुद्धा केल्या. मानधनाऐवजी वेतनश्रेणी लागू करा या मागणीसाठी संघटनेने आतापर्यंत अनेक आंदोलन झाले, मोर्चे काढले परंतु न्याय मिळाला नाही. परंतु नव्या सरकारकडून, समान वेतन, समान काम यानुसार आम्हाला अनेक अपेक्षा असल्याचे मोर्चेकऱ्यांचे म्हणणे होते. मोर्चाचे नेतृत्व सतीश गोटमुखले, आयुब शेख, मनोज गोसावी, दत्तात्रय पाटील, राहुल झोडापे, भाऊ कुनगाटकर, व अशोक जाधव यांनी केले.

Web Title: Pay Scale instead of remuneration: morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.