काटाेल तालुक्यात शांततेत मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:13 AM2021-01-16T04:13:12+5:302021-01-16T04:13:12+5:30
काटाेल : तालुक्यातील खंडाळा, भाेरगड व माळेगाव या तीन ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि. १५) मतदान घेण्यात आले. या तिन्ही ठिकाणी ...
काटाेल : तालुक्यातील खंडाळा, भाेरगड व माळेगाव या तीन ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि. १५) मतदान घेण्यात आले. या तिन्ही ठिकाणी सकाळी ९.३० वाजेपर्यंत सरासरी ११.१२ टक्के तर दुपारी ३.३० वाजेपर्यंत ७२.२८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला हाेता. मतदानाचा वेग हळूहळू वाढत गेला. त्यामुळे या गावांमध्ये एकूण .............. टक्के मतदारांना मतदान केले. तिन्ही गावांमधील एकूण नऊ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले असून, एकूण ५१ उमेदवारांचे राजकीय भाग्य मशीनबंद करण्यात आले. संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
काेराेना संक्रमण लक्षात घेता तिन्ही गावांमधील मतदान केंद्रांवर मतदारांना त्यांचे हात सॅनिटाईझ करूनच प्रवेश देण्यात आला. कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मतदान केंद्रांवर चाेख पाेलीस बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता. मतदारांना मतदान केंद्रांवर आणण्यासाठी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्र वाहनांची व्यवथा केली हाेती. दुपारनंतर बहुतांश केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या हाेत्या. वृद्ध व दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली हाेती. मतदान प्रक्रियेदरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.