विदर्भात कोरोनाबाधितांचा उच्चांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:08 AM2021-03-21T04:08:09+5:302021-03-21T04:08:09+5:30
नागपूर : विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवारी रुग्णसंख्येने पुन्हा उच्चांक गाठला. ६,६६३ रुग्ण व ४९ मृत्यूची नोंद ...
नागपूर : विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवारी रुग्णसंख्येने पुन्हा उच्चांक गाठला. ६,६६३ रुग्ण व ४९ मृत्यूची नोंद झाली. वाढत्या रुग्ण व मृत्यूच्या संख्येने चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे, अमरावती विभागासोबतच आता नागपूर विभागातील इतर जिल्ह्यात बाधितांच्या संख्येने वेग घेतला आहे. शनिवारी नागपूर विभागात ४,३५७ रुग्ण व ३३ मृत्यू तर, अमरावती विभागात २,३०६ रुग्ण व १६ मृत्यूची नोंद झाली. सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात आढळून आले. ३,६७९ रुग्ण व २९ बाधितांचे बळी गेले. बुलडाणा जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. ७६८ नव्या रुग्णांची भर पडली व ३ मृत्यू झाले. यवतमाळ जिल्ह्यात पुन्हा रुग्ण वाढताना दिसून येत आहे. ४७१ रुग्ण व ६ मृत्यूची नोंद झाली. याशिवाय, अकोला जिल्ह्यात ४०० रुग्ण व ३ मृत्यू, अमरावती जिल्ह्यात ३८० रुग्ण व ३ मृत्यू, वर्धा जिल्ह्यात ३२६ रुग्ण व ३ मृत्यू, वाशिम जिल्ह्यात २८७ रुग्ण व १ मृत्यू, भंडारा जिल्ह्यात १३२ रुग्ण तर चंद्रपूर जिल्ह्यात १२६ रुग्ण व एका मृत्यूची नोंद झाली आहे.
जिल्हा : रुग्ण : ए.रुग्ण : मृत्यू
नागपूर : ३६७९ : १८९४६६ : २९
गोंदिया : ५३ : १४९९५ : ००
भंडारा : १३२ : १४९६९ : ००
चंद्रपूर : १२६ : २५५१८ : ०१
वर्धा : ३२६ : १६३६५ : ०३
गडचिरोली : ४१ : १०१०९ : ००
अमरावती : ३८० : ४४९३८ : ०३
यवतमाळ : ४७१ : २४२११ : ०६
वाशिम : २८७ : १२५८९ : ०१
बुलडाणा : ७६८ : २९३०५ : ०३
अकोला : ४०० : २३८६६ : ०३