वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:12 AM2021-09-15T04:12:09+5:302021-09-15T04:12:09+5:30
बुटीबाेरी : अज्ञात भरधाव वाहनाने पादचाऱ्यास जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना ...
बुटीबाेरी : अज्ञात भरधाव वाहनाने पादचाऱ्यास जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना एमआयडीसी बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील साजफुड कंपनी परिसरात साेमवारी (दि. १३) सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली.
नरेश तुळशीराम कांबळे (४२, रा. फ्रेंडस काॅलनी, बुटीबाेरी) असे मृताचे नाव आहे. नरेश कांबळे हा एमआयडीसी परिसरातील आपल्या भावाच्या भाेजनालयाकडे पायी जात हाेता. दरम्यान, साजफुड कंपनी परिसरात वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनचालकाने त्याला जाेरात धडक दिली. यात ताे गंभीर जखमी झाला. त्याला लगेच बुटीबाेरी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तिथे तपासणीअंती डाॅक्टरांनी त्याला मृत घाेषित केले. या प्रकरणी मनाेज तुळशीराम कांबळे (३६, रा. फ्रेंड्स काॅलनी, बुटीबाेरी) यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी बुटीबाेरी पाेलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भादंवि कलम २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या गुन्ह्याचा पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक काकडे करीत आहेत.