वाहनाच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:19 AM2021-09-02T04:19:38+5:302021-09-02T04:19:38+5:30

काटाेल : अज्ञात भरधाव वाहनाने पादचाऱ्यास जाेरात धडक दिली. त्यात पादचारी व्यक्ती गंभीर जखमी झाला. ही घटना काटाेल-नागपूर मार्गावरील ...

Pedestrian seriously injured in vehicle collision | वाहनाच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी

वाहनाच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी

Next

काटाेल : अज्ञात भरधाव वाहनाने पादचाऱ्यास जाेरात धडक दिली. त्यात पादचारी व्यक्ती गंभीर जखमी झाला. ही घटना काटाेल-नागपूर मार्गावरील लिंगा शिवारात मंगळवारी (दि.३१) रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. जखमी व्यक्तीची ओळख पटलेली नाही.

जखमीवर काटाेल येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यास नागपूर मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमीच्या प्रकृतीत सुधारणा आहे; मात्र ताे स्वत:चे नाव व पत्ता सांगण्यास असमर्थ असल्याने त्याची ओळख पटलेली नाही. ताे व त्याचा भाऊ काटाेल येथे शेतीकाम करीत असल्याची माहिती त्याने दिली. या व्यक्तीबाबत कुणालाही माहिती असल्यास काटाेल पाेलीस ठाण्यात संपर्क साधावा. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास पाेलीस निरीक्षक महादेव आचरेकर करीत आहेत.

Web Title: Pedestrian seriously injured in vehicle collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.