पादचारी महिलेचा दुचाकीच्या धडकेने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:11 AM2021-09-07T04:11:49+5:302021-09-07T04:11:49+5:30

नागपूर : अज्ञान दुचाकीस्वाराने रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना यशोधरा येथे घडली. आम्रपाली ...

Pedestrian woman killed by two-wheeler | पादचारी महिलेचा दुचाकीच्या धडकेने मृत्यू

पादचारी महिलेचा दुचाकीच्या धडकेने मृत्यू

Next

नागपूर : अज्ञान दुचाकीस्वाराने रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना यशोधरा येथे घडली. आम्रपाली राजेंद्र गजभिये (५०, भांडेवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. रविवारी दुपारी ही महिला भगीरथाबाई मावटकर या महिलेसोबत चिखली चौकाकडे पायदळ निघाली होती. दरम्यान, वीटभट्टी चौकात रस्ता ओलांडताना एका अज्ञात बाइकस्वाराने धडक दिली. यात आम्रपाली गंभीर जखमी झाल्या. उपचारासाठी रुग्णालयात नेले असता मृत घोषित करण्यात आले.

......................................

अल्पवयीन सहकाऱ्यांसह चोर गवसला

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असलेला आरोपी नंदनवन पोलिसांना दोन अल्पवयीन सहकाऱ्यांसह सापडला. त्याच्याकडून चोरीच्या सात प्रकरणांचा उलगडा झाला असून दीड लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. आकाश ऊर्फ आखाडी कृष्णा दुलेवाले (१९, गाडगे नगर, नंदनवन) असे या आरोपीचे नाव असून त्याचे दोन्ही सहकारी अल्पवयीन आहेत. आकाश सराईत गुन्हेगार आहे. रमना मारुती येथील सुदाम निमजे यांच्याकडे १२ मार्चला त्याने चोरी केली होती. यानंतर श्रीकृष्ण नगरातील कीर्ती किराणा स्टोअर्समध्ये चोरी करून खाद्यतेलाच्या डब्यांसह अनेक वस्तू चोरल्या होत्या. आपल्या अल्पवयीन साथीदारांसह नंदनवन पोलीस स्टेशन परिसरातही तीन ठिकाणी त्याने चोरी केली होती. सीसीटीव्हीवरून हा प्रकार लक्षात आल्याने त्याला अटक करण्यात आली. अन्य चार ठिकाणी केलेल्या चोरीची कबुली त्याने दिली आहे. प्रभारी पोलीस निरीक्षक रवींद्र दुबे, कर्मचारी सिद्धार्थ पाटील, संदीप गवळी, भीमराव ठोंबरे, विनोद झिंगरे, प्रेम खैरकर, राजेश बन्सोड यांनी ही कारवाई केली.

Web Title: Pedestrian woman killed by two-wheeler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.