नागपुरातील रॅडिसन ब्ल्यू हॉटेलवर दंडात्मक कारवाई होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 08:20 PM2019-01-16T20:20:15+5:302019-01-16T20:20:54+5:30

वर्धा रोड येथील पंचतारांकित हॉटेल रॅडिसन ब्ल्यूमध्ये जेवणात अळ्या निघाल्याच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हॉटेलवर कारवाई करून खाद्यान्नाचे तीन नमुने घेतले होते. या नमुन्याचा अहवाल आला असून एका नमुन्यात पनीर कमी दर्जाचे भेसळयुक्त आणि मेद कमी प्रमाणात आढळून आले आहे. अहवालाच्या आधारे हॉटेलवर खटला दाखल करण्यात येणार असून अन्न व औषध विभागाचे सहआयुक्त (अन्न) शशिकांत केकरे यांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे. हॉटेलवर १५ डिसेंबरला कारवाई करण्यात आली होती.

Penal action will be taken against Radisson Blu Hotel in Nagpur | नागपुरातील रॅडिसन ब्ल्यू हॉटेलवर दंडात्मक कारवाई होणार

नागपुरातील रॅडिसन ब्ल्यू हॉटेलवर दंडात्मक कारवाई होणार

googlenewsNext
ठळक मुद्देभेसळयुक्त पनीर, जेवणात अळ्या : सहआयुक्तांकडे सुनावणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वर्धा रोड येथील पंचतारांकित हॉटेल रॅडिसन ब्ल्यूमध्ये जेवणात अळ्या निघाल्याच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हॉटेलवर कारवाई करून खाद्यान्नाचे तीन नमुने घेतले होते. या नमुन्याचा अहवाल आला असून एका नमुन्यात पनीर कमी दर्जाचे भेसळयुक्त आणि मेद कमी प्रमाणात आढळून आले आहे. अहवालाच्या आधारे हॉटेलवर खटला दाखल करण्यात येणार असून अन्न व औषध विभागाचे सहआयुक्त (अन्न) शशिकांत केकरे यांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे. हॉटेलवर १५ डिसेंबरला कारवाई करण्यात आली होती.
या प्रकरणी सुनावणीनंतरच दंड आकारण्याची तरतूद आहे. त्यानुसार हॉटेलवर दंड आकारण्यात येण्याचे निश्चित आहे. या शिवाय तीन तारांकित हॉटेलचा परवाना देण्याचे आणि कारवाईचे अधिकार मुंबईतील सेंट्रल लायसन्स अथॉरिटीला आहे. पण तपासणीचे अधिकार विभागीय अन्न व औषध प्रशासन विभागाला आहेत. त्यानुसार तक्रारीनंतर विभागाने हॉटेलवर कारवाई केली आणि नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.
याप्रकरणी शिवसेनेच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी ग्राहकांना जेवण देताना हॉटेल व्यवस्थापनाकडून मनमानी आणि बेजबाबदारपणा होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. कारवाईत तत्परता न दाखविल्यामुळे अन्न व औषधी प्रशासन विभागाविरोधातही नाराजी व्यक्त केली होती.
प्राप्त माहितीनुसार, १५ डिसेंबर २०१८ ला हॉटेल रॅडिसन ब्ल्यूमध्ये एका फार्मा कंपनीची दोन दिवसीय कॉन्फरन्स सुरू होती. पहिल्या दिवशी जेवणात अळ्या निघाल्या होत्या. त्याची तक्रार फार्मा कंपनीच्या सदस्यांनी हॉटेल व्यवस्थापनाकडे केली होती. अशी तक्रार पुढे येणार नाही, असे हॉटेल व्यवस्थापनाने सांगून ग्राहकांना आश्वस्त केले होते. दुसऱ्या दिवशी जेवणात पुन्हा अळ्या निघाल्या होत्या. या घटनेची तक्रार दुपारी २ वाजता एफडीएकडे केली होती. पण विभागाची चमू सायंकाळी ६.३० वाजता हॉटेलमध्ये पोहोचली. कारवाईसंदर्भात प्रशासनाचा उशीर आणि संगनमत यासारखे गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत. प्रशासनाने उशिरा कारवाई केल्यामुळे तक्रारकर्त्यांचा रोष होता.
सहआयुक्त केकरे यांच्याकडे सुनावणी होणार
रॅडिसन हॉटेलवर कारवाई केल्यानंतर तीन नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या नमुन्यांचा अहवाल आला असून त्यापैकी दोन नमुने प्रमाणित तर एका नमुन्यात पनीरमध्ये भेसळ आढळून आली आहे. हा अहवाल सुनावणीसाठी सहआयुक्त शशिकांत केकरे यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.
मिलिंद देशपांडे, सहायक आयुक्त(अन्न),
अन्न व औषधी प्रशासन विभाग.

Web Title: Penal action will be taken against Radisson Blu Hotel in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.