मास्क न वापरणाऱ्या ५१ नागरिकांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:08 AM2021-03-24T04:08:11+5:302021-03-24T04:08:11+5:30

नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी मंगळवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार ५१ नागरिकांकडून प्रत्येकी ५०० रुपये याप्रमाणे २५ ...

Penalty for 51 citizens who do not wear masks | मास्क न वापरणाऱ्या ५१ नागरिकांना दंड

मास्क न वापरणाऱ्या ५१ नागरिकांना दंड

Next

नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी मंगळवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार ५१ नागरिकांकडून प्रत्येकी ५०० रुपये याप्रमाणे २५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क देण्यात आले. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ३६,४४६ नागरिकांविरुद्ध कारवाई करून १ कोटी ६५ लाख ८२ हजाराचा दंड वसूल केला आहे.

मंगळवारी मनपा उपद्रव शोध पथकाद्वारे धरमपेठ झोनअंतर्गत ६, हनुमाननगर ९, धंतोली ५, नेहरूनगर ६, गांधीबाग ४, सतरंजीपुरा ४, लकडगंज ४, आशीनगर ८, मंगळवारी झोनअंतर्गत ५ जणांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली. पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.

Web Title: Penalty for 51 citizens who do not wear masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.