थकीत मालमत्ता करावरील शास्ती माफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:25 AM2020-12-15T04:25:50+5:302020-12-15T04:25:50+5:30
-अभय योजना-२०२० लागू असलेल्या काळात करदात्यांकडून नागपूर महानगरपालिकेस घेणे असलेली मूळ रक्कम १०० टक्के भरल्यास थकीत रकमेवर प्रतिमाह दोन ...
-अभय योजना-२०२० लागू असलेल्या काळात करदात्यांकडून नागपूर महानगरपालिकेस घेणे असलेली मूळ रक्कम १०० टक्के भरल्यास थकीत रकमेवर प्रतिमाह दोन टक्के आकारण्यात आलेला दंड आणि नियम ५० अन्वये जप्ती अधिपत्र बजावणी शुल्क अथवा वसुलीचा खर्च नियमानुसार काही प्रमाणात माफ करण्यात येईल.
- ३१ मार्च २०२० पर्यंत थकीत असलेल्या मालमत्ता करासह चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता करसुद्धा अदा केल्यास शास्ती रकमेवर ८० टक्के सवलत देण्यात येणार आहे. ही रक्कम १५ डिसेंबर २०२० ते १४ जानेवारी २०२१ च्या रात्री ८ वाजतापर्यंत अदा करणाऱ्यांना सवलत मिळेल.
- १५ जानेवारी २०२१ ते १४ फेब्रुवारी २०२१ च्या रात्री ८ वाजतापर्यंत या कालावधीत ३१ डिसेंबर २०२१ पर्यंतच्या थकीत मालमत्ता कराची रक्कम महापालिका निधीत जमा केल्यास शास्तीवर ५० टक्के सवलत मिळेल.
- योजनेअंतर्गत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील प्रकरण ८ कराधान नियम ४१ खालील शास्ती किंवा नियम ५० खालील जप्ती अधिपत्र बजावणी शुल्क किंवा वसुली खर्च पूर्णत: किंवा अंशत: वा जाहिरात शुल्क वगळून माफ करण्यात येईल.
................
ठराविक कालावधीतच लाभ मिळणार
अभय योजना ही ठराविक कालावधीत जमा केलेल्या रकमांनाच लागू राहील. योजना कालावधीच्या आधी अथवा नंतर भरणा होणाऱ्या रकमांना योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या कालावधीसाठी सवलतीचा लाभ घ्यावयाचा आहे त्या कालावधीतील कोणतेही प्रलंबित असलेले अपील, पुनरीक्षणासाठी आलेले आवेदन, संदर्भ आवेदन, न्यायालयात दाखल केलेला दावा किंवा रिट याचिका प्रलंबित असल्यास ते विना अट मागे घ्यावे लागेल. अभय योजनेचा लाभ मिळाल्यानंतर अपील, पुनरीक्षण आवेदन, संदर्भ आवेदन, न्यायालयात दावा किंवा रिट याचिका दाखल केल्यास अथवा सदर योजनेतील लाभधारक भविष्यात थकबाकीदार आढळल्यास अभय योजनेअंतर्गत संबंधित कालावधीसाठी दिलेल्या सवलती मनपातर्फे काढून घेण्यात येईल.
.