दोन कोचिंग क्लासला दंड ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:12 AM2021-09-16T04:12:35+5:302021-09-16T04:12:35+5:30
मनपाच्या एनडीएस पथकाची कारवाई : कोविड नियमांचे उल्लंघन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात ...
मनपाच्या एनडीएस पथकाची कारवाई : कोविड नियमांचे उल्लंघन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. याचा विचार करता कोचिंग क्लासला नियमांचे पालन न करणाऱ्या दोन कोचिंग क्लासेसला बुधवारी मनपाच्या उपद्रव शोध पथकाने (एनडीएस) १० हजारांचा दंड ठोठावला.
मनपाच्या गांधीबाग झोन क्षेत्रातील बडकस चौक परिसरात सुरू असलेल्या करिअर अकॅडमी व महाल येथील हॉनर्स क्लासची एनडीएस पथकाने तपासणी केली असता २५ ते ३० विद्यार्थी वर्गात उपस्थित असल्याचे आढळून आले. दोन्ही कोचिंग क्लासेसला प्रत्येकी ५ हजारांचा दंड केला.
संक्रमणाचा धोका विचारात घेता नागपूर शहरातील शाळा, महाविद्यालये सुरू करण्याला परवानगी दिलेली नाही. यापुढे वर्ग सुरू ठेवल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा एनडीएस पथकाने संचालकांना दिला. बुधवारी पथकाने ४२ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.