न्यू इयर सेलिबे्रशनसाठी तरुणाईचा पेंच-ताडोबा हा ‘फर्स्ट चॉईस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 11:35 AM2017-12-28T11:35:17+5:302017-12-28T11:37:57+5:30
नवीन वर्षाचा उदय आता केवळ तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. यासाठी अनेकांनी पेंच-ताडोब्याला आपली पहिली पसंती दर्शविली आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : नवीन वर्षाचा उदय आता केवळ तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येकच जण जोरादार प्लॅनिंग करीत आहेत. काहींनी शहरातच जल्लोषाचे नियोजन केले आहे तर अनेकांना शहराबाहेर अभयारण्यांमध्ये हा दिवस अविस्मरणीय करायचा आहे. यासाठी अनेकांनी पेंच-ताडोब्याला आपली पहिली पसंती दर्शविली आहे. विदर्भासोबतच जवळपासच्या वन्यक्षेत्रातील हॉटेल आणि रिसॉट बुकिंग जवळजवळ फूल झाले आहे. असे बुकिंग करणाऱ्यांमध्ये तरुणाईची संख्या मोठी आहे. ही बाब लक्षात घेऊन वन विभाग आणि पर्यटन विभागानेही विशेष तयारी केली आहे. या दिवशी येथे गर्दी होईल व ऐनवेळी आनंदावर विरजण नको याचा विचार करून अनेकांनी काही महिन्यांआधीच बुकिंग केले आहे. मराठवाडा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथूनही शेकडो पर्यटक नवीन वर्षाच्या स्वागतासाठी वन्यक्षेत्रात दाखल होणार आहेत.
या ठिकाणांचेही विशेष आकर्षण
पचमढी, वाकी, बीना, रामा डॅम, खेकरानाला, रामटेक, कामठी, आदासा, घोडाझरी, बोर, उमरेड-कऱ्हांडला ही वन्यक्षेत्रेही पर्यटकांना आकर्षित करीत आहेत.