पेन्शन ५ ऑगस्टला जमा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:07 AM2021-07-31T04:07:50+5:302021-07-31T04:07:50+5:30

शासकीय निवृत्तिवेतनधारकांना सातव्या वेतन आयोगाच्या दुसऱ्या हप्त्याचे प्रदान करताना होणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे जुलै २०२१ चे निवृत्तिवेतन संवितरणास विलंब होण्याची ...

The pension will be collected on August 5 | पेन्शन ५ ऑगस्टला जमा होणार

पेन्शन ५ ऑगस्टला जमा होणार

Next

शासकीय निवृत्तिवेतनधारकांना सातव्या वेतन आयोगाच्या दुसऱ्या हप्त्याचे प्रदान करताना होणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे जुलै २०२१ चे निवृत्तिवेतन संवितरणास विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ५ ऑगस्टपर्यंत संबंधित बँकेमार्फत निवृत्तिवेतन जमा होईल.

-------------

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय प्रतिपूर्ती

विमाछत्र योजनेचे नूतनीकरण

नागपूर : शासकीय सेवेच्या अंतिम वर्षात पदार्पित शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच ३० जून २०११ नंतर सेवानिवृत्त झालेले निवृत्तिवेतनधारक, कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांच्यासाठी वैद्यकीय योजना सुरू करण्यात आली असून वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेचे नूतनीकरण करण्याची मुदत २३ ऑगस्ट २०२१ पर्यंत आहे. ३० जून २०११ नंतर ते आजतागायत सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय प्रतिपूर्ती विमाछत्र योजनेचे नूतनीकरण करावे, असे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी अरविंद गोडे यांनी केले आहे.

१ जुलै २०२१ ते ३० जून २०२२ या कालावधीत सेवानिवृत्त होणारे अधिकारी, कर्मचारी यांच्या विमाछत्र योजनेची कार्यवाही संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांच्यामार्फत पूर्ण करण्यात येईल. अधिक माहितीसाठी यासंबंधी शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वरील कालावधीमध्ये कार्यरत व निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी याबाबत नोंद घ्यावी, असे वरिष्ठ कोषागार कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

Web Title: The pension will be collected on August 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.