बेलावासीयांनी जपलं ‘नातं’ रक्ताचं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:07 AM2021-07-22T04:07:18+5:302021-07-22T04:07:18+5:30

बेला : ‘लोकमत’च्या वतीने स्वातंत्र्यसंग्राम सेनानी व ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक स्व.जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेंतर्गत महारक्तदान ...

The people of Bela chanted 'Naat' of blood | बेलावासीयांनी जपलं ‘नातं’ रक्ताचं

बेलावासीयांनी जपलं ‘नातं’ रक्ताचं

Next

बेला : ‘लोकमत’च्या वतीने स्वातंत्र्यसंग्राम सेनानी व ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक स्व.जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेंतर्गत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. याअंतर्गत बुधवारी उमरेड तालुक्यातील बेला येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यास बेलावासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

बेला पत्रकार संघ, संताजी मित्रपरिवार, चेतना चिंतामणी गणेश मंदिर कमिटी, नाभिक युवा शक्ती बेला यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक लोकजीवन शाळेत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिराचे उद्घाटन बेला पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंकज वाघोडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच सुभाष तेलरांधे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष ज्योतीकुमार देशमुख, माजी सरपंच अरुण बालपांडे, पंचायत समिती सदस्य पुष्कर डांगरे, पत्रकार राजू चिपडा, नंदू भुजाडे, विनोद डांगरे, राजू सूर्यवंशी, दिलीप घिमे, दिनेश गोलघाटे, सूरज कांबळे, आकाश सोनटक्के, संदीप धंद्रे, महेंद्र तेलराधे, जयकुमार बोधाने, कैलाश साठवणे, संदीप नौकरकर, प्रणिल अवचट आदी उपस्थित होते. संजय मंदे दाम्पत्याने लग्नाचा वाढदिवस रक्तदान करून साजरा केला हे विशेष.

Web Title: The people of Bela chanted 'Naat' of blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.