डेंग्युमुळे नागपूरची जनता चांगलीच गारद, ३० दिवसांत २९५ रुग्ण 

By सुमेध वाघमार | Published: October 2, 2023 05:48 PM2023-10-02T17:48:46+5:302023-10-02T17:52:37+5:30

आतापर्यंत डेंग्यू सदृश्य आजाराचे ७,०६१ रुग्णांची नोंद

People of Nagpur are very sick due to dengue, 295 patients registered in 30 days | डेंग्युमुळे नागपूरची जनता चांगलीच गारद, ३० दिवसांत २९५ रुग्ण 

डेंग्युमुळे नागपूरची जनता चांगलीच गारद, ३० दिवसांत २९५ रुग्ण 

googlenewsNext

नागपूर : डेंग्यूमुळेनागपूरची जनता चांगलीच गारद झाली आहे. मागील ३०दिवसांत डेंग्यूचे २९५ रुग्ण आढळून आले आहेत. १ जानेवारी ते ३० सप्टेंबरपर्यंत रुग्णांची संख्या ६८७ वर पोहचली आहे. तर आतापर्यंत डेंग्यू सदृश्य आजाराचे ७,०६१ रुग्णांची नोंद झाली आहे.

एक डास माणसांची किती दाणादाण उडवतो आणि व्यवस्था कोलमडून टाकतो, याचा अनुभव नागपुरकर अनुभवत आहे. डेंग्यूवर अद्यापही स्पष्ट उपचार नाहीत. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो. मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आजही जागोजागी पावसाचे पाणी साचून आहे. पाऊस परतीच्या मार्गावर असला तरी सप्टेंबर महिन्यातही डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येत आढळून येण्याची शक्यता आहे. परिणामी, प्रत्येकाने खबरदारी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

Web Title: People of Nagpur are very sick due to dengue, 295 patients registered in 30 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.