प्री-पेड इलेक्ट्रीक मीटर विरोधात जनाक्रोश; ९ ते १६ जून दरम्यान शहरभर अभियान
By मंगेश व्यवहारे | Published: June 8, 2024 08:31 PM2024-06-08T20:31:15+5:302024-06-08T20:31:31+5:30
सायंकाळी गिट्टीखदान चौकात जाहीर सभा होणार आहे. १५ जुन रोजी खरबी चौकात जाहिर सभा, १६ जुन रोजी एस. टी. स्टॅन्ड जाधव चौक, गणेश पेठ येथे सभा होणार आहे.
नागपूर : समाजातील कुठल्या घटकाशी चर्चा न करता हुकुमशाही पद्धतीने ग्राहकांचे जुने वीज मीटर बदलवून प्री-पेड मीटर लावल्या जात आहे. या माध्यमातून ग्राहकांच्या खिश्यातून हजारो कोटी रुपये वसूल केले जाणार आहे. या विरोधात नागपुरात प्री-पेड इलेक्ट्रीक मीटर विरोधी नागरीक संघर्ष समितीतर्फे जनाक्रोश अभियान राबविण्यात येत आहे. ९ ते १६ जून दरम्यान विविध माध्यमातून प्री-पेड मीटरचा विरोध करण्यात येणार आहे.
यासंदर्भात समितीचे संयोजक मोहन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीत अभियानाची रुपरेषा ठरविण्यात आली. ९ जुन रोजी सायंकाळी ६ वाजता नाईक तलाव पोलीस चौकी समोर समितीच्या वतीने प्री-पेड मीटरचा विरोध करण्यासाठी जाहीर सभा घेण्यात येणार आहे. ११ जुन २४ रोजी कोतवाली पोलीस चौकी महाल येथे सभा होणार आहे. १२ जुन रोजी दुपारी १२ वाजता उर्जा म॑त्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील घरासमोर ठिय्या आ॑दोलन करण्यात येणार आहे.
तसेच सायंकाळी गिट्टीखदान चौकात जाहीर सभा होणार आहे. १५ जुन रोजी खरबी चौकात जाहिर सभा, १६ जुन रोजी एस. टी. स्टॅन्ड जाधव चौक, गणेश पेठ येथे सभा होणार आहे. शनिवारी झालेल्या बैठकीला अरूण लाटकर, गुरूप्रितसि॑ग, सुरेश वर्षे, शाम काळे, युगल रायलु, रवि॑द्र पराते, विजय बाभुळकर, स॑जय राऊत, अशोक दगडे, विठ्ठल जुनघरे, नासिर खान, च॑द्रशेखर मौर्य, सादिक खान, दुनेश्वर आरीकर, प्रशा॑त नखाते, मुकेश मासुरकर, नरेश निमजे, जयश्री चहा॑दे, ज्योती अ॑डरसहारे, रमेश शर्मा,मोहन बावने, बाबा शेळके, अरुण वनकर आदी उपस्थित होते.