कोरोनाबाधितांचा टक्का घसरतोय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:08 AM2021-05-06T04:08:40+5:302021-05-06T04:08:40+5:30

सावनेर/ काटोल/ नरखेड/ कळमेश्वर/ रामटेक/ हिंगणा/ मौदा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत आहे; मात्र ...

The percentage of corona sufferers is declining ... | कोरोनाबाधितांचा टक्का घसरतोय...

कोरोनाबाधितांचा टक्का घसरतोय...

Next

सावनेर/ काटोल/ नरखेड/ कळमेश्वर/ रामटेक/ हिंगणा/ मौदा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत आहे; मात्र तेराही तालुक्यात सकाळी बाजारपेठात होणारी गर्दी तिसऱ्या लाटेला निमंत्रण देणारी ठरत आहे, हे निश्चित. मंगळवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार तेरा तालुक्यात १८५३ नव्या रुग्णांची भर पडली तर २२ रुग्णांचा मृत्यू झाला. बुधवारी २७१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे ही संख्या आता ९०,८१४ इतकी झाली आहे. सध्या ग्रामीण भागात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २९,४६८ झाली आहे. सावनेर तालुक्यात १३३ रुग्णांची भर पडली. यात सावनेर शहरातील २० व ग्रामीणमधील ११३ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात चिचोली प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ४ रुग्णांचा मृत्यू झाला.

काटोल तालुक्यात ४७५ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत १०२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात काटोल शहरातील १४ तर ग्रामीण भागातील ८८ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात कचारी सावंगा केंद्रांतर्गत २९, कोंढाळी केंद्रांतर्गत (४१) तर येनवा केंद्रांतर्गत १८ रुग्णांची नोंद झाली.

नरखेड तालुक्यात १५८ रुग्णांची भर पडली. यात नरखेड शहरातील १५ तर ग्रामीण भागातील १४३ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४५८८ तर शहरात ११८३ इतकी झाली आहे. यातील ३६१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ७६ इतकी आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव अंतर्गत येणाऱ्या गावात (२३), जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र (९२), मेंढला प्राथमिक आरोग्य केंद्र (२०) तर मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ८ रुग्णांची नोंद झाली.

हिंगणा तालुक्यात ४२३ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात १३५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरी येथे ४३ तर हिंगणा येथे ३६ रुग्णांची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत १०,७९२ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ८३०६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तालुक्यात आतापर्यंत २३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

रामटेक तालुक्यात ८० रुग्णांची भर पडली. यात रामटेक शहरातील १ तर ग्रामीणमधील ७९ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात आतापर्यंत ६१८१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. यातील ४७९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १३८४ इतकी आहे. उमरेड तालुक्यात ९० रुग्णांची भर पडली. यात शहरातील ६३ तर ग्रामीण भागातील २७ रुग्णांचा समावेश आहे.

कळमेश्वरात पुन्हा भडका

कळमेश्वर तालुक्यात बुधवारी कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली. तालुक्यात १३५ नव्या रुग्णांची भर पडली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प.क्षेत्रातील ३२ चर ग्रामीण भागातील १०३ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात मोहपा येथे सर्वाधिक १७ रुग्णांची नोंद झाली. यासोबतच धापेवाडा येथील कोरोनासाखळी अद्यापही अबाधित आहे.

Web Title: The percentage of corona sufferers is declining ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.